सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
958 views • 9 hours ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१००१
अफगाणिस्तानातून पुढे मुघलांची अनेक आक्रमणे येथे झाली. सबक्तगीन इ.स.९९७ मध्ये मृत्यू पावल्यानंतर खोरासान प्रांताचा सुभेदार म्हणून त्याचा मुलगा महमूद याने सुत्रे हातात घेतली. सामानींचे अधिपत्य झुगारून त्याने इ.स.९९९ मध्ये त्याने स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले. नौशेटा आणि सिंधू यामधील प्रदेशात इ.स.१००१ मध्ये मोठी युद्धे झाली. त्यावेळी पेशावर येथे हिंदू राजा जयपाल यांनी महमुदला प्रतिबंध केला. २७ नोव्हेंबर इ.स.१००१ मध्ये झालेल्या युद्धात राजा जयपाल यांचा पराभव होऊन त्यांना बंदी बनविण्यात आले. त्याचा मुलगा आनंदपाल हा महमुद विरुद्ध उभा ठाकला. ज्या पठाणांनी यावेळी राजा जयपाल-आनंदपाल यांना मदत केली.त्यांना मोठ्या शिक्षा देऊन महमुदाने त्या सगळ्यांना इस्लामची शिक्षा दिली. हिंदू राजा जयपालचा पराभव झाला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/nsscYRt67dk?feature=share
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६६७
(मार्गशीर्ष वद्य सप्तमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार)
महाराज आणि पोर्तुगीजां मध्ये तह!
धर्मांध पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी करून गोवेकरांना चांगलीच अद्दल घडवली. जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरायने वकील पाठवून तहाची मागणी केली. महाराजांनीही सकोपंत काका यांना वकील म्हणून नामजाद करून व्हाईसरायकडे पाठवले. तहाची कलमे ठरवली. आजच्या दिवशी व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८०
मुंबईच्या इंग्रजांनी २७ नोव्हेंबर १६८० ला सुरतेस पत्र पाठवले.
छत्रपती संभाजी महाराजांना सिद्दीचा समाचार घ्यायचा होता त्यापुर्वी इंग्रजांना समज देणे गरजेचे होते म्हणून त्यांनी आपला वकील आवजी पंडित यांना २० नोव्हेंबर १६८० रोजी मुंबाईस पाठवले या वकिलाने इंग्रजांना कडकडीत शब्दात सुनावले ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेस २७ नोव्हेंबर १६८० च्या पत्रात कळवले होते. “छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजाविरुध्द युध्द पुकारतील संभाजी राजांचा आलेला वकील पाहताच सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. छत्रपती संभाजी राजांच्या आरमाराला तोंड देण्याची तयारी नव्हती. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीच्या बंदोबस्तासाठी किनार्यावर सतत दहा हजार माणसे निष्कारण आडवावी लागतील संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तर ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीची मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालूच राहीली तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आह."
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८१
सण १६७८ मध्ये शंभुराजे जेव्हा दिलेरखानाकडे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक बहिणही होती. पुढे शंभुराजेंनी विजापुरजवळ असताना शिवाजी महाराजांच्या मदतीने मुघलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. पण यावेळी त्यांची पत्नी आणि बहीण मात्र मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजे गादीवर आल्यानंतर त्यांनी पत्नीला व बहिणीला सोडवण्यासाठी नगरच्या किल्ल्यावर हल्ले सुरू केले. शंभुराजेंचे सैन्य नगरच्या किल्ल्याजवळ जाऊन किल्ल्यात घुसण्याची संधी शोधत होते. पण मुघल किल्लेदाराकडे मराठ्यांशी टक्कर देऊ शकेल इतके सैन्यबळ नव्हते. त्यामुळे तो हैराण झाला होता. त्याने आपली स्थिती रहुल्लाखानाला कळवल्यावर त्याच्या मदतीसाठी आज्जमशहा आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले.आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१८९०
महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन!
शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले.
सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला, म्हणून यांचे नांव फुले असे पडले. शिक्षणास सुरुवात झाल्यावर ज्योतिबांनी वा.ब.फडके यांचे मांग जातीचे गुरु लहूजीबुवा यांचेजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचे शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवावृत्तीने व कार्यनिष्ठेनें हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजन समाजाला साक्षर करावे व त्याला सत्यधर्माचे ज्ञान करून द्यावे असा विचार यांच्या मनांत येऊ लागला. सन १८५१ मध्ये यांनी बुधवार पेठेतलि चिपळुणकरांच्या वाड्यांत मुलींची शाळा काढली. या कामी यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला; परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला. व सरकारने यांना दोनशे रुपयांची शालजोडी अर्पण केली. त्यानंतर सन १८५३ मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांकरिता दोन शाळा यांनी स्वतःच्या खर्चाने काढल्या. विधवाविवाहाचा प्रसार करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसा एक विवाह घडवून ही आणला. तसेच पतित मुलींच्या हातून भ्रूणहत्येचे पातक घडू नये म्हणून यांनी बालहत्या-प्रतिबंधक गृह काढले. यानंतरची यांची महत्वाची कामगिरी म्हणजे १८७३ मध्ये यांनी आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्राज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धान्त शोधून काढले ते यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिपादिले. ब्राह्मण व वेदपुराणादि ग्रंथांवर प्रखर हल्ला करून सबंध समाजरचनाच बदलून टाकण्याची दिशा यांनी दाखविली. 'ब्राह्मणांचे कसब', 'गुलामगिरी', 'जातिभेदविवेकसार', इशारा', 'शेतक-्याचा आसूड' वैगे पुस्तकें यांनीं लिहिलीं आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
34 likes
29 shares