ShareChat
click to see wallet page

#🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२७_नोव्हेंबर_१६६७ ( मार्गशीर्ष वद्य सप्तमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार ) छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजां मध्ये तह! धर्मांध पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी करून गोवेकरांना चांगलीच अद्दल घडवली. जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरायने वकील पाठवून तहाची मागणी केली. महाराजांनीही सकोपंत काका यांना वकील म्हणून नामजाद करून व्हाईसरायकडे पाठवले. तहाची कलमे ठरवली. आजच्या दिवशी व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. संदर्भ: पसास ११८३ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२७_नोव्हेंबर_१६५७ शिवरायांनी रायगड जिल्ह्यातील चौल हा प्रांत जिंकून स्वराज्यात सामील केला. “चौल” जगाच्या नकाशातील एके काळचे भरभराटीचे बंदर ! इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे. त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते ! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२७_नोव्हेंबर_१७३७ तापीच्या दक्षिणेस चिमाजी अप्पांनी रहिमानखानास मारले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२७_नोव्हेंबर_१७५१ महादजीपंत पुरंदरे, राणोजीचे पुत्र दत्ताजी व महादजी यांनी पुण्यावर चालून येत असलेल्या सलाबतजंग व बुशी यांच्या सैन्यावर हल्ला करून, त्यांचा पराभव केला.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती

1.5K जणांनी पाहिले
15 तासांपूर्वी