नवरात्री आठवी माळ रंग मोरपंखी💙
45 Posts • 37K views
Santosh D.Kolte Patil
20K views 2 months ago
शारदीय नवरात्र माळ - आठवी रंग-मोरपंखी जागर नवरात्री चा !! देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे. ॐ महागौरी दैव्ये नमो नम: ॥ श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः। महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा॥ सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्। ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्।। या देवी सर्वभू‍तेषु मां महागौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ दुर्गामातेचे आठवे रूप महागौरी. महागौरी देवीने स्वत:च्या पूर्व जन्मात भगवान श्री शंकराला पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती, ही कठोर तपस्या करत असतांना देवीचे शरीर निस्तेज होऊन पूर्ण काळे झाले होते. देवीची कठोर तपस्या बघून भगवान श्री शंकराला तिची दया आली व त्यांनी देवीचे शरीर गंगेच्या पवित्र द्रव्याने स्वच्छ केले त्यामुळे देवीचे शरीर गौरवर्णी दिसू लागली. म्हणूनच देवीला ” महागौरी ” असे संबोधण्यात आले. देवीला चार भुजा आहेत. एका भुजेची अभयमुद्रा, दुस-या भुजेत त्रिशूल, तिस-या भुजेत डमरू तर चौथ्या भुजेची वरमुद्रा आहे. देवीचे वाहन बैल आहे.महागौरी देवी कुमारीका अवस्थेत असल्याचे समजते म्हणुन ह्या देवीच्या पुजनाच्या दिवशी कुमारीकांचे पुजन देखील केले जाते. आज आठवी माळ.. रंग - मोरपंखी देवीचे रूप - #महागौरी #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 ##शारदीय नवरात्रौत्सव #नवरात्री आठवी माळ रंग मोरपंखी💙 #🌷देवी महागौरी🙏 ##🌹देवी महागौरी🙏
221 likes
178 shares