#🥰प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन👶
यंदाचं वर्ष हे काही बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खऱ्या अर्थाने खास ठरलं आहे. कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल-कतरिना कैफ यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एक कपल आईबाबा झाले आहेत. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी पाळणा हलला आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी राजकुमार राव आणि पत्रलेखा आईबाबा झाले आहेत. पत्रलेखाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राजकुमार रावने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शनिवारी(१५ नोव्हेंबर) राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना मुलगी झाली आहे. आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या घरात लक्ष्मी आली आहे. "आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने दिलेलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे", असं म्हणत राजकुमार रावने बाबा झाल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
#मनोरंजन #मनोरंजन बातम्या #💐अभिनंदन #trending