चहा
357 Posts • 1M views
आ नं द 🌻 सा ग र
2K views 4 months ago
#चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो. उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो. कधीही मिळाला तरी वाह वाह असतो... मुंबईत तो पिला जातो, पुण्यात घेतला जातो कोल्हापुरात टाकला जातो तर, नागपुरात तो मांडला जातो चहा म्हणजे चहा असतो, कधीही मिळाला तरी वाह वाह असतो... क्षण आनंदाचा असो, वा आलेलं असो टेंशन आळस झटकायला लागतो तसाच थकवा घालवायला ही लागतो. चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो... काहीच काम नसताना पण चालतो आणि खूप काम असलं तरी पण लागतो, गप्पा मारताना जसा लागतो तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो... चहा ला वेळ नसते पण, वेळेला चहाच लागतो चहा म्हणजे चहा असतो, कधीही मिळाला तरी वाह वाह असतो... #☀️गुड मॉर्निंग☀️ 🙏🌹🌹🍫☕☕☕ 🍫🌹 🌹🙏
26 likes
51 shares