#🪙PM मोदींनी 100 रुपयांचे नाणे जारी केले🔴
आज संघ शतकोत्तर झाला...!
शताब्दीपूर्तीच्या या सोहळ्यात देशाचा एक स्वयंसेवक पंतप्रधानपदापर्यंत पोहोचतो आणि संघासाठी 100 रुपयांचे नाणे व डाक तिकीट समर्पित करतो, ही केवळ गौरवाची बाब नाही तर संघाच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची साक्ष आहे.
स्वयंसेवक म्हणून हा क्षण अवर्णनीय आहे.
आज जेव्हा आपल्या संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाची साक्षीदार पिढी आपण झालो आहोत, तेव्हा मनी एकच भाव दाटतो हे जीवन भाग्यवान आहे. कारण संघाने मला केवळ विचार नाही दिला, तर राष्ट्रासाठी जीव ओतून जगण्याची दिशा दिली.एक स्वयंसेवक म्हणून माझ्या मनातून एकच संदेश देतो "मी आहे ते फक्त राष्ट्रासाठी आहे."संघ हा माझ्यासाठी संस्थाच नाही, तो माझं कुटुंब, माझा श्वास, माझं प्रेरणास्थान आहे.
आज 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंतःकरणातून एकच आवाज फूटतो "संघ हेच जीवन… आणि राष्ट्रसेवा हाच धर्म!"
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢1 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #ब्रेकिंग न्यूज #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स