#🙏शिवदिनविशेष📜 *🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳ 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६५९ अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्गडसहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील. अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवरायांनी वाई सोडली आणि घोड्याच्या टापा वळाल्या थेट कराडच्या रोखाने. अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीना भेटले . नेताजीना त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याना मिळाले. दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले आणि आजच्या दिवशी पन्हाळगडसहित कोल्हापूर स्वराज्यात पुन्हा एकदा सामील झाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६७९ मराठ्यांचे पाणी आणि रसद संपत आहे, तेव्हा ते कारण पुढे करून आपण तहासाठी घाई करावी व बेट मिळवण्याचा प्रयत्न करावा. या वेळीच २३ नोव्हेंबर रोजी सुरतेहून आलेले बंगाल मर्चट व "ऍने" ही जहा
#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती