꧁◉❥❤️SONA PATIL
❤️❥◉꧂
1K views • 2 months ago
*"मैत्री" एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं..मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात..जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं..मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत..मात्र एकदा का असे हे रेशीमबंध जुळले की ते कधीच कोणत्याही कारणासाठी तुटत नाहीत..जन्माला आल्याबरोबर जीवनात अनेक नाती आपल्यासोबत आपोआप जोडली जातात..आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात..प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात..पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात..शाळा,कॉलेज आणि नोकरी-व्यवसायामुळे माणसाला जगातील अफाट विश्व खुलं होतं..या प्रवासात मैत्रीचे नाते हळूहळू गुंफले जाते..मैत्री ही ठरवून करता येत नसली तरी ज्यांच्याशी आपले विचार आणि मत जुळतं अशांचीच आपली मैत्री दृढ होत जाते..आज जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो..एक वेळ मी जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरेल पण हा दिवस नाही..जुन्या मैत्रीचे बंध जपत नव्या मैत्रीशी जोडले जाण्यासाठी सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या तुम्हाला माझ्या खुप खुप शुभेच्छा..आपली साथ अशीच अखंड व अविरत राहो..हीच परमेश्वराचरणी प्रार्थणा..अश्या दिनी शुभेच्छा दिने माझ्या प्रथम कर्तव्यच आहे..आज मी काही असेल तर तुमच्या साथीने व शुभेच्छा जोरावरच तुम्ही सोबत असल्यावर जिवन जगण्यात एक वेगळीच मज्जा व उत्साह प्राप्त होतो..पुनच्छ मैत्रीदिनी मंगलमय शुभेच्छा.. *!!.. शुभेच्छुक ..!!* *••┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈• #मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
12 likes
17 shares