#🙆♂️प्रसिद्ध क्रिकेटरचा वनडेला रामराम
पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि ३ जूनला त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. या लढतीपूर्वी पंजाब किंग्स आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने वन डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. मॅक्सवेलने १३ वर्षांच्या वन डे कारकीर्दिला पूर्णविराम लावण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मॅक्सवेलला आयपीएल २०२५ मध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. ७ सामन्यांत त्याने फक्त ४८ धावा केल्या आहेत आणि दुखापतीमुळे त्याने माघार घेतली होती 🏏
#🏏आणखी एका क्रिकेटरची निवृत्ती #🏏क्रिकेट प्रेमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #jitubhai225