शिवभक्त सुरेश भोसले
876 views • 8 hours ago
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ
⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६५९
अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्गडसहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील. अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवरायांनी वाई सोडली आणि घोड्याच्या टापा वळाल्या थेट कराडच्या रोखाने. अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीना भेटले . नेताजीना त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याना मिळाले. दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले आणि आजच्या दिवशी पन्हाळगडसहित कोल्हापूर स्वराज्यात पुन्हा एकदा सामील झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६७९
मराठ्यांचे पाणी आणि रसद संपत आहे, तेव्हा ते कारण पुढे करून आपण तहासाठी घाई करावी व बेट मिळवण्याचा प्रयत्न करावा. या वेळीच २३ नोव्हेंबर रोजी सुरतेहून आलेले बंगाल मर्चट व "ऍने" ही जहाजे ताफ्यात सामील झाली. पैकी 'ऍने'चा उपयोग होणार होता. परंतु बंगाल मर्चट अत्यंत मोठे शिबाड असून त्याचा उपयोग तसा कमीच होता. मुंबईकरांनी २८ नोव्हेंबर रोजी पेशवा मोरोपंतांना पत्र लिहिले व बेट सोडण्याबाबत विचारले व त्यात इंग्रजांनी रसद पाण्याची परिस्थिती कळवली. तेव्हा मोरोपंतांनी आपण बेट कधीही सोडणार नाही व इंग्रजांना मिळालेली माहिती चुकीची असून आमचे सैन्य व्यवस्थित आहे व ते युद्धासाठी तयार आहे असे कळवले. याने इंग्रज आता अगदीच जेरीस आले आणि त्यांनी सुरतेला तहासाठी काय करावे, याचे विचार मागितले. तसेच त्यांनी सुरतेला कळवले की, वेढा असाच सुरू ठेवायचा असल्यास आम्हाला अधिक पैशांची गरज आहे व सध्या तरी ५००० शेराफिंस (१० शेराफिंस = १३ रुपये) त्वरित पाठवून द्यावे, जहाजांची संख्या वाढत असल्यामुळे खर्च वाढू लागला होता, परंतु यश मिळत नव्हते. सुरतकरही या प्रकरणाला वैतागले होते. त्यांनी तूर्त नाविक दल तसेच ठेवावे व कॅप्टन जॉन गोल्डबरो आणि कप्तान जॉन दानियाल (हे दोघे अनुक्रमे बंगाल मर्चट व 'ऐंने चे कर्णधार होते) यांना छ.शिवाजी महाराजांच्या मुलुखात हल्ला करण्यास पाठवावे, ज्याने त्याची शिबंदी इतर ठिकाणी विभागली जाईल व बेटाला पुरवठा खंडित होईल. या दरम्यान सुरतकर राजापूरकर इंग्रजांच्या मदतीने बेट राखून तह करण्याचा प्रयत्न करणार होते. दरम्यान १ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला, सिद्धी व इंग्रज यांना तो अडवता आला नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६८२
कल्याण भिवंडी ताब्यात आली तर मराठी मुलखात शिरणे सोपे जाईल या हेतूने औरंगजेबाने आपला मातब्बर सरदार हसनअलीखान याला १४ हजार सैन्यासह त्या भागात पाठवले होते. पण शंभुराजेंचे ध्येयनिष्ठ सरदार या हल्ल्याना समर्थपणे तोंड देत होते. कल्याण भिवंडीजवळच मेहंदळी गावात मराठ्यांनी मुघल ठाण्यांची लुटालूट केली होती. मुघल सरदार रणमस्तखान याला बहादूर खान ही पदवी मिळली होती. तो कल्याणला आला असताना मराठ्यांची ७ हजार स्वार व ८ हजार प्याद्यांची तुकडी कल्याण भिवंडीला गेली.ही बातमी कळताच खानही तिथे गेला व तिथे गढी तयार करून तिथले ठाणे त्याने मजबूत केले. तिथेच मराठ्यांच्या सैन्याची व रणमस्तखानाच्या सैन्याची लढाई झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७२३
रोजी सरदार पिलाजीराव जाधव यांनी वसईच्या गव्हर्नरला पाठविलेल्या पत्राची नोंद!
"माझे स्वामी छत्रपती शाहू महाराज यांनी मला किल्ले वसई वर स्वारी करण्याकरिता पाठविले आहे. तरिही मी संयम करतो. तुम्ही तुमचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी आमच्या कडे पाठवावा". सरदार पिलाजीराव जाधव हे ज्येष्ठ आणि अनुभवी सरदार असल्याने त्यांनी वसई प्रांतावर परत जाणार होते, व म्हणून त्यांनी वाटाघाटीसाठी एकदा दुत पाठविण्याची सुचना एकदम हल्ला केला नाही. छत्रपती शाहू महाराज यांच्या मागण्या पोर्तुगिजांनी मान्य केल्यास वसईवर हल्ला न करता ते वसईच्या गव्हर्नरला केली होती. परंतु ती सुचना त्याने लक्षात घेतली नसल्याने सरदार पिलाजीराव जाधव यांना वसईवर स्वारी करणे भाग पडले. त्यांच्यानंतर सरदार दावलजी सोमवंशी यांच्याही फौजा, पोर्तुगिजांच्या अमलाखालच्या प्रदेशात घुसल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७५३
दाभाडे बंधु महाराष्ट्रात असल्याची संधी साधून अहमदाबादच्या जोरावरखा बाबी या मोगल ठाणेदाराने त्यांची ठाणी उठवली. दाभाडे बंधुंना हे कळल्यावर ते अहमदाबाद वर चाल करुन गेले, त्यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री उमाबाई दाभाडे याही होत्या. अहमदाबाद जवळ उमाबाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युध्दात दाभाडेंचा प्रचंड विजय झाला. अहमदाबादच्या रणभुमीवरील पराक्रमा बद्दल थोरल्या शाहू महाराजांनी उमाबाईंना सोन्याचे तोडे देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच हा सन्मान त्यांना वंशपरंपरागत करुन दिला. सोन्याचे तोडे पायात घालण्याचा मान फक्त छत्रपतींच्या घराण्यातील स्त्रियांना होता. असा मान मिळवणार्या सेनापती उमाबाई दाभाडे ह्या एकमेव महिला होतं. सेनापती उमाबाई दाभाडेंचा अल्पशा आजारपणाने तळेगाव येथे मृत्यु झाला महाराणी ताराराणी साहेब यांच्या नंतर मराठेशाहीतील नावाजलेल्या उमाबाई या पराक्रमी स्त्री होत्या. सेनापती उमाबाई दाभाडेंची समाधी तळेगाव दाभाडे पुणे येथे आहे. त्यांच्या मृत्युची तारीख २८ नोव्हेंबर १७५३.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७८०
ठाणे आणि कल्याण घेतल्यानंतर आता इंग्रजांची नजर वळली ती वसईवर, दि. १६ ऑक्टोबर रोजी कॅ. गॉडार्ड सुरतेहून मुंबईकरांच्या मदतीसाठी निघाला. दि. २८ नोव्हेंबर इ.स.१७८० रोजी गोडार्डन वसईला मोर्चे लावले. इंग्रजी तोफा वसईवर आग ओकू लागल्या. यावेळी वसईवर मराठ्यांचे किल्लेदार होते. विसाजीपंत लेले. इंग्रजांच्या या हल्ल्याला विसाजीपंतांनी दोन आठवड्यांपर्यंत चांगलाच प्रतिकार केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
23 likes
29 shares