
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
🚩रोजचे ऐतिहासिक शिवदिनवीशेष🚩📱📲8975379375
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १० ऑक्टोबर इ.स.१६६४
छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर इ.स.१६७३
१० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मालकीची पेण व नागोठणे नदीवरील ठाणी त्याने उद्ध्वस्त केली. सिद्दी संबळने तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे, स्त्रीया व मुले पळवून गुलाम बनवून आपल्याबरोबर मुंबईस आणिली. काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झाला. त्यामुळे मुंबईच्या इंग्रज प्रमुखाने सिदीला आपली नाराजी कळवणारे व तंबी देणारे पत्र पाठवले. प्रेसिडेंटच्या ह्या पत्राकडे दुर्लक्ष करून सिद्दीने आपले अत्याचार, दहशतयुक्त जुलूम चालूच ठेवला. श्रीमान रायगडाहून आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शंभर सैनिकांनी सिद्दीच्या माणसांना चकित करून निदर्यपणे कापून काढले. ह्या घटनेनंतर सिद्दीचे निघृण अत्याचार शांत झाले असे वाटते. इ.स. १६७४ च्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्दी यांच्यात तुंबळ युद्ध झाले. दोन्ही पक्ष अगदी जेरीस आले होते. तेव्हा सिद्दीने सुरतच्या इंग्रज प्रेसिडंटाला दोघांत मध्यस्थी करून शांतता निर्माण करण्याची विनंती केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबळने रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी खाडीत शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दौलतखान यांजवर हल्ला चढवला. दोन्ही नौदल प्रमुख जखमी झाले. सिद्दीचे १०० तर मराठ्यांचे ४४ सैनिक कामी आले. मराठ्यांचा विजय झाला. त्यामुळे सिदी संबळ जंजिऱ्याच्या २१ मैल दक्षिणेकडील हरेश्वर बंदरात निघून गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर १६७५
१० आॕक्टोबर १६७५ रोजी या संदर्भात खामगाव येथे एक मजहर आला. त्यावर मावळातील करंजवणे येथील देशमुख, जैतजी नाईक, बिनमल्हारजी नाईक तसेच कोंढवे, कात्रज, नांदेड, खडकवासला, नांदोशी, वडगाव, आंबेगाव, बावधन, हिंगणे, खेरडी, गोऱ्हे, भुकुम, सुस, लवळे, कोथरुड, इ. गावच्या पाटलांच्या निशाणी तसेच परीट-मोगरी, सुतार-वाकस, तेली-पहार, महार-विळादोरी, गुरव, कुंभार, लोहार, तराळ यांच्याही निशाणी मजहरावर आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर इ.स.१७६०
भाऊसाहेबासह मराठे सैन्य दिल्लीत दि. २२ जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत राहीले. त्यानंतर त्यांनी आपली छावणी दिल्ली पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या शालीमार बागेत हलवली. तेथे मराठ्यांची दि. १० ऑक्टोबर १७६० पर्यंत छावणी होती. ह्या ८० दिवसांच्या वास्तव्यात मराठ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. उत्तरेकडील मामलतदाराकडील येणाऱ्या पैशावर खर्च भागविण्याची पाळी आली. जाटांकडील सालाबाद खंडणीचे पैसेही भिडेमुळे भाऊस मागता आले नाहीत. उत्तरेत गारा व गव्हावरली रोग पडल्यामुळे दुष्काळ पडला, महागाई झाली तसा सैन्याचा खर्च वाढत चालला होता. दिल्ली घेतल्यामुळे तेथील राजवंश व राजवाडा यांच्या खर्चाचा बोजाही मराठयांवर पडला. तो खर्च महिना सुमारे १ लाख रुपये होता. मराठ्यांच्या छावणीच्या दरमहाच्या ७ लाख रुपये खर्चात आणखी एक लाख रुपये खर्चाची भर पडली. हा खर्च भागविण्यास भाऊस पैशाचा पुरवठा सारखा व्हावयास हवा होता. पण तसे होईना. पेशव्यांच्या पत्राप्रमाणे उत्तरेतील मामलेदारांनी अर्धा वसूल भाऊकडे व अर्धा पेशव्यांकडे पाठवावयाचा होता. तेव्हा मामलेदार भाऊस लिहित की, वसूल झालेले पैसे पेशव्यांस पाठविले व पेशव्यास लिहित की, भाऊस पाठविले. आणि पैशाचा भरणातर कोठेच करत नसत. ह्यामुळे हलाखी निर्माण झाली. “फौजभारी पण पोटास नाही. घोडी दाणा खावयास विसरली, माणसास अन्न मिळतां कठीण असे झाले" मराठ्यांच्या तोफखान्याचे बैल खाण्यास नमिळाल्यामुळे व आजारामुळे मरु लागले. यामुदतीत अबदालीच्या फौजेने अंतर्वेदीतील मुलुख व्यापला त्यामुळे दिल्ली शहरात धान्याचा व घासदाण्याचा पुरवठा होईना. सैन्यास उपवास पडू लागल्यामुळे वादशाही दिवाणी-इ-खास ह्या दरबारच्या जागेस रुप्याचे छत होते त्याचा पत्रा काढून गरज भागविण्याची भाऊने तोड काढली. दि. ६ ऑगस्ट रोजी छत फोडून ते वितळवून ९ लक्ष रुपये तयार केले. ह्या छताचा काही भाग वजीर गाजिउद्दीन खानाने त्यापूर्वी काढून नेला होता. ह्या ९ लाखापैकी काही रुपये सरदारास दिले, बाकी फौजेस वाटले. जेणेकरुन सुमारे एक महिना गुजरण झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर इ.स.१७७३
दादांनी निजामअली आणि हैदरयाजवर स्वारी करण्यासाठी विसाजीपंतांनी आणलेल्या पैशातून सैन्य उभारणी केली आणि वरील दोधावर स्वारी करावी अशी मसलत सखाराम बापू, प्रमुख मंडळी व शिंदे, होळकर वगैर सरदार मानकरी यांना बोलावून आणून विचार केला. सर्वांचा रुकार झाला. त्यावरून दसऱ्यास १० ऑक्टोबर १७७३ रोजी पुण्याहून निघून डेरे गारपिरावर दिले. बापू, त्रिंबकराव, नाना, हरिपंत, मोरोबा वगैरे मंडळीस आपल्यामागे पुण्यास ठेविल्यास आपल्याला मोठा धोका निर्माण होईल अशी दादास सार्थ भिती वाटल्याने त्या सर्व मावळ्यांची त्यांनी मोट बांधली व त्यास आपल्याबरोबर लष्करात चालविले. गारपिरावरून ते पेडगांवला आले. तिथेच आनंदीबाईच्या सांगण्यावरून आणलेली पेशवेपदाची वस्त्रे दादांनी स्विकारली आणि ह्याच ठिकाणी रामशास्त्रींनी येऊन 'दादा तुम्ही खुनी आहात आणि खुनास शिक्षा देहांत प्रायशित्ताची, ती तुम्ही भोगली पाहिजे' हे त्यास ऐकविले. त्यामुळे दादांवरील कारभाऱ्यांचा विश्वास विचलित झाला आणि त्यांची मने दादांविरुद्ध एक झाली, आणि त्यातूनच बारभाईचे कारस्थान उभारले गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*#ऊर्जामंत्र*
*स्वताच्या मेहनती वर विश्वास ठेवा,कारण प्रयत्न हे कधीच व्यर्थ जात नाहीत....!!..*
*🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩*
#⛳शिवसंस्कृती #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज
#📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ
#⛳शिवसंस्कृती #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*"आपण पुढे काय करणार हे महत्वाचे नाही तर,आपण सध्या काय करत आहोत हे जास्त महत्वाचे आहेत....!!..*
*🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩*
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६३५
जिवाजी महाले यांची जयंती🚩
प्रतापगडावर अफजल खानाशी महाराज लढा देत असताना महाराजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडाचे त्यांनी हात छाटले होते. आपल्या चपळाईने महाला यांनी महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण प्रचलीत झाली. शिवरायांचे अपरिचीत मावळे जिवाजी महाले छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक होते. छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६४८
हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४८ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६६७
मोघलांना जाऊन मिळण्याबाबत काही राजकारण असेनही...
छत्रपती शिवरायांनी आग्र्यावरून परतताच छत्रपती संभाजीराजेंना सात हजार स्वारांची मनसबदारी मिळवुन मोघलांशी सख्य केले. त्यावेळी दक्षिणेचा सुभेदार होता शहजादा मुअज्जम उर्फ शहा आलम. छत्रपती संभाजीराजेंनी ९ ऑक्टोबर १६६७ ला शहाजाद्याच्या भेटीस राजगडावरुन प्रयाण केले.
वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात" .....हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की," छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती.
करे पुढे सांगतो की " शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उद््गार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी महाराज हे सर्व घटना छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना फार आनंद झाला. अशा तह्रेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला." अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले. फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील... हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपती संभाजीराजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते. तेंव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजीराजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजीराजांना मदत केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६८४
छत्रपती संभाजीमहाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती :-
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) संभाजीची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल
होऊन संभाजीचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे.
पण फर्मानांतील बहुतेक कलमे शिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठविलेल्या एकही फर्मानाची शिकंदरकडून अंमलबजावणी होऊ शकली नाही. तेव्हा औरंगजेबास आदिलशहा छत्रपती संभाजी राजांशी मैत्री व सख्यत्व करतो असा संशय आला. मराठ्यांविरुद्ध मोहिमेत १६८४ मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्धच्या युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आदिलशहीविरुद्ध युद्ध पुकारले. औरंगजेबाने ९ ऑक्टोबर १६८४ शहाअलमला फार मोठी मदत पाठविली. २८ डिसेंबरला एक मणाची तोफ व २०/२० शेरांची एक अशा चार तोफा रूहुल्लाखानाच्या मदतीस विजापुरास रवाना केल्या. या हालचालीत इ.स. १६८४ हे साल गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ८ ऑक्टोबर इ.स.१६५९
(कार्तिक शुद्ध तृतीया शके १५८१ संवत्सर विकारी वार शनिवार)
सईबाईसाहेब यांच्या निधनाचे दुखः स्वराज्यासाठी बाजूला सारून शिवाजी महाराज जावळी परिसराची पाहणी करून प्रतापगडी दाखल! खान वळवळ करत होता त्याला अटकाव करणे गरजेचे होते. त्यामुळे मनी ठाम निश्चय करूनच राजे स्वदुःख बाजूला सारून अफजल मोहीमेसाठी प्रतापगडी दाखल.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ ऑक्टोबर इ.स.१६६८
(अश्विन शुद्ध चतुर्दशी शके १५९० संवत्सर किलक वार गुरूवार)
महाराज व अदिलशाही यांच्यात तह
विजापूरच्या आदिलशहाने महाराजांबरोबर पुन्हा नव्याने तह केला. दि.१६ सप्टेंबर इ.स.१६६८ अदिलशहाने सोलापूर किल्ला व त्या खालील १८० लक्ष होनांचा मुलुख मोगलांना देऊन त्यांच्याशी तह केला. लवकरच विजापुरकरांनी महाराजांशी ही पुन् हा नव्याने तह केला. पश्चिम किनाऱ्याची सुभेदारी महाराजांना प्राप्त झाली. मोबदल्यात त्यांनी ६ सहा लक्ष रुपये खंडणी अदिलशहास द्यावी असे ठरले. इ. स.१६५९ पासून सततच्या स्वाऱ्या युद्ध शाहीस्तेखानाची स्वराज्यातील लुट आग्रा भेट आग्र्याहून सुटका या सगळ्यांचा प्रजेला प्रचंड त्रास झाला होता. अशातच पुन्हा मोहीम काढण्यापेक्षा जनतेमध्ये स्वराज्यासाठी स्थैर्य आवश्यक होते ज्यामुळे महाराजांना प्रशासकीय कामांना गती देता येणार होती. थोडी स्थिरस्थावरता आणून शिंततेचा काळ घालवणे आवश्यक होते. त्यामुळे महाराजांनी अदिलशाहिशी नव्याने तह केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ ऑक्टोबर इ.स.१६७९
केग्वीन खांदेरीला पोचला
मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ ऑक्टोबर इ.स.१६८३
(अश्विन वद्य त्रयोदशी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार सोमवार)
चौलच्या वेढ्यादिवशी इंग्रजांचे पत्र !!
या एका पत्रातून मुंबईकर इंग्रज लिहीतात की चौलला खंबीर वेढा पडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने जवळील एका टेकडीचा ताबा घेतला असून त्यावर मराठे मोठ्या तोफा चढवून चौलवर जबरदस्त मारा करणार आहेत. सर्वांचा असा समज आहे. की तोफांचा मारा सुरू झाल्यावर किल्ला ५ पाच दिवसांपेक्षा जास्त लढवला जाणार नाही. चौलची अवस्था अतिशय वाईट झाली असून या चौलच्या वेढ्यात पोर्तुगीज हतबल झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ ऑक्टोबर इ.स.१६८३
शहजादा अकबराच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी सिद्दी जाणार असल्याची इंग्रजांची नोंद!
अफाट सैन्याबळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात अनेक आघाड्यांवर लढूनही सततच्या अपयशाने इ.स.१६८३ पावसाळ्यापूर्वी औरंगजेब बादशहाची वृत्ती हताश झाली होती. दक्षिणेच्या लढायांत त्याने आपल्या मुलांना व सरदारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढताना आलेल्या अपयशाबद्दल अनेक दूषणे दिली होती. पण त्यांच्या पेक्षाही वाईट परिस्थिती औरंगजेबाची झाली होती आणि ती वेळ त्याच्यावर एका २५ २६ वर्षीय - राजाने आणली होती. त्यामुळे तो चिडखोर आणि संशयी बनला होता. पोर्तुगीज मुलूखावर छत्रपती संभाजीराजेंनी शहजादा अकबराला सोबत घेऊन स्वारी केली होती. औरंगजेबाला हे समजताच त्याने सिद्दीला डिचोलीला जाऊन अकबरावर पाळत ठेवण्यास सांगितले होते. यासंबंधी इंग्रजांची नोंद "अकबराच्या हालचालीवर पाळत ठेवण्यास सिद्दी १० दिवसांत गोव्याकडे जाणार आहे.क्वाण्डम गव्हर्नर कडून विकत घेतलेल्या जहाजावर अकबर धान्यसामग्री भरत आहे अशी बातमी आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ ऑक्टोबर इ.स.१८०४
फत्तेपुराहून कूच करून यशवंतराव मथुरेस गेले. तेथे इंग्रजांचा सरंजाम होता, तो निघून परत आग्रास आला व मथुरेस पोचल्यावर महाराज दिनांक ८ ऑक्टोबरला (१८०४) दिल्लीच्या तटबंदीखाली आले. यावेळी दिल्लीचा नामधारी बादशहा इंग्रजांचे अंकित होता. बादशहाच्या नावाचे बळ आपल्या सत्तेस जोडणे हा हेतू होता. “आपण बादशहाचे सेवक” अशा अर्थाचा नवा शिक्का यशवंतरावानी पाडला व उपयोगात आणला तो बादशहासंबंधीचा लोकादर आपल्याकडे वळावा या हेतूचा होता. दिल्लीत इंग्रजांची फौज थोडी असल्याने, दिल्ली काबीज करून बादशहास ताब्यात घेता आल्यास इंग्रजांवर कडी होईल, अशी महाराजांना आशा वाटत होती. परंतु, दिल्लीचा पाडाव करावयास यशवंतरावांना पुरेशी सवड मिळाली नाही. दिल्लीवर यशवंतरावानी बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले. दिनांक १४ ऑक्टोबरला सर्व फौजेनिशी मोठा हल्ला चढविला. हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे तर इंग्रज सेनापती लांब लांब मजला मारून दिल्लीनजीक आल्याची खबर यशवंतरावांच्या कानी आली. तेव्हा त्यांनी दिल्लीचा नाद सोडला. ते यमुना ओलांडून दुआबांत घुसले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #⛳शिवसंस्कृती #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय
*बघण्याची नजर जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुन्दरच दिसेल....!!..*
*🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩*
#🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ
#🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ