#😭मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन🙏
अतिशय दुःखद बातमी!💐....ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे आकस्मिक निधन...वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. मृण्मयी लागू ही त्यांची एकुलती एक मुलगी लेखिका, अभिनेत्री आहे. चार दिवस सासूचे, अगली, भागम भाग अशा अनेक कलाकृतीतून विवेक लागू यांनी अभिनय केला होता. मात्र गेले काही दिवस ते या क्षेत्रापासून थोडे दूरच असलेले पाहायला मिळाले. मात्र आज त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विवेक लागू यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!💐
#भावपूर्ण श्रद्धांजली #भावपूर्ण आदरांजली, शतशः नमन #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🤩20 जुन अपडेट्स🆕