#😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू
मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचे दोन बळी घेतले, फडणवीससाहेब आता...??
जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ते शिवनेरीवर पोहोचले असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे आंदोलनासाठी कूच केले आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला सुरूवात होण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू
#🔥मराठा आरक्षण आंदोलन #ब्रेकिंग न्यूज #मोठी बातमी 🗞️😲 #📢28 ऑगस्ट अपडेट्स🆕