#📢22 नोव्हेंबर घडामोडी➡️
केंद्र सरकारने २१ नोव्हेंबरपासून चार नव्या कामगार संहितांची अंमलबजावणी करत देशातील कामगार क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. 29 जुने कायदे रद्द करून आधुनिकीकरण करण्यात आले असून आता सर्व कामगारांसाठी किमान वेतन, ग्रॅच्युइटी, पीएफ, ईएसआयसी बंधनकारक करण्यात आले आहे. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचाही यात समावेश होत आहे. महिलांना समान वेतन आणि त्यांच्या संमतीने रात्री कामाची परवानगी, सर्व कामगारांना नियुक्ती पत्राची हमी, 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी, निश्चित-मुदतीच्या कर्मचाऱ्यांना एका वर्षानंतर ग्रॅच्युइटी आणि ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन यांसारखे अनेक लाभ लागू झाले आहेत. हे बदल ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत 2047’च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
#कायदा #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰