Failed to fetch language order
Failed to fetch language order
Failed to fetch language order
ताज्या बातम्या
174 Posts • 1M views
#😱पोलिस महासंचालकांची गोळी झाडून आत्महत्या💥 हरियाणा पोलीस दलातील एडीजीपी वाय पूरन कुमार मंगळवारी दुपारी त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. प्राथमिक तपासात पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पूरन कुमार त्यांच्या मेव्हण्याच्या घराजवळ साऊंडप्रूफ बेसमेंटमध्ये असताना ही घटना घडली. त्यांनी त्यांच्या सर्व्हिस बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याचं बोललं जात आहे. पूरन कुमार यांनी मृत्यूपूर्वी ९ पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात काही विद्यमान आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. ही सुसाईड नोट फॉरेन्सिक तपासानंतर सार्वजनिक केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी पूरन कुमार यांनी रोहतकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतला होता. पूरन कुमार हरियाणा कॅडरमधील २००१ बॅचचे अधिकारी होते. ते त्यांच्या स्पष्टवक्त्या आणि व्यवस्थेतील अनियमितता उघड करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार जपानच्या दौऱ्यावर होत्या. त्यांची धाकटी मुलगी जी घरी होती, दुपारी २ वाजताच्या सुमारास ती बेसमेंट गेली आणि तिचे वडील रक्ताच्या थारोळ्यात सोफ्यावर पडलेले आढळले. तिने ताबडतोब सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. एक रिव्हॉल्व्हर, मृत्युपत्र आणि ९ पानांची अखेरची चिठ्ठी सापडली आयजी पुष्पेंद्र सिंह, एसएसपी कौर आणि एसपी सिटी प्रियांका घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि संपूर्ण तपास प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, मृत्युपत्र आणि ९ पानांची अंतिम चिठ्ठी जप्त केलं आहे. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास पूरन कुमार यांनी त्यांच्या पीएसओकडून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेतली आणि त्याला काही तरी काम आहे असं सांगितले. त्यानंतर ते घरच्या बेसमेंटमध्ये गेले. तिथे साऊंडप्रुफ असल्याने गोळीचा आवाजही कुणाला ऐकायला आला नाही. घटनेच्या १ तासाने जेव्हा मुलगी तिथे गेली तेव्हा तिथलं दृश्य पाहून तिला धक्का बसला. कोण होते पूरन कुमार? मूळचे आंध्र प्रदेशातील आणि अनुसूचित जाती समुदायाचे असलेले पुरन कुमार यांनी बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) पदवी घेतली होती आणि ते आयआयएम अहमदाबादचे पदवीधर देखील होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी स्वतःच्या विभागाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांनी एकदा तत्कालीन हरियाणा डीजीपी मनोज यादव यांच्यावर भेदभावाचा आरोप केला होता आणि या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली होती. अलीकडेच त्यांची रोहतक रेंजच्या आयजी मधून सुनारिया रोहतक येथील प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. पुरन कुमार आणि त्यांच्या पत्नीला दोन मुली आहेत. मोठी मुलगी परदेशात शिक्षण घेत आहे तर धाकटी मुलगी तिच्या कुटुंबासह चंदीगडमध्ये राहते. #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #ताज्या बातम्या
19 likes
19 shares
#😮गौतमी पाटीलला अटक होणार?🙆‍♀️ गौतमीवर कारवाई होणार? चंद्रकांतदादांचा डीसीपींना फोन...| गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघाताची गंभीर दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतलीय...त्यांनी थेट डीसीपीला फोन करुन दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्यात. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕4 ऑक्टोबर अपडेट्स #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या
88 likes
1 comment 82 shares
#🙆‍♂️पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला🤦‍♂️ भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चेत आहे. अलीकडील एका घटनेत, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान शॉचा माजी सहकारी मुशीर खान याच्याशी मैदानावर वाद झाला. याव्यतिरिक्त, फेब्रुवारी २०२३ मध्ये सेल्फी घेण्यास नकार दिल्याने चाहत्यांकडून हल्ला झाल्याचा आणि कारची तोडफोड झाल्याचाही आरोप शॉने केला होता. सविस्तर माहिती: मुशीर खानसोबतचा वाद (ऑक्टोबर २०२५): पुण्यात महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील तीन दिवसांच्या सराव सामन्यादरम्यान पृथ्वी शॉ आणि मुशीर खान यांच्यात मैदानावर वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनला. चाहत्यांकडून हल्ला (फेब्रुवारी २०२३): एका घटनेत, मुंबईत पृथ्वी शॉने एका गटाला सेल्फी काढण्यास नकार दिला, ज्यानंतर त्या गटाने शॉ आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला आणि त्यांची कार तोडफोड केली, असा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आतापर्यंतच्या घटनांचा धांडोळा: सध्याच्या घडामोडींमुळे पृथ्वी शॉच्या व्यावसायिक कारकिर्दीवर परिणाम झाला आहे, कारण तो आता भारतीय वरिष्ठ संघातून बाहेर आहे आणि याआधीही तो वादग्रस्त घटनांमध्ये सापडला होता. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या #🆕ताजे अपडेट्स
28 likes
44 shares
#😭बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!😱 हिमाचलमध्ये बसवर डोंगरावरून ढिगारा कोसळला:15 जणांचा मृत्यू, 2 मुलांना वाचवले; बिलासपूरमध्ये दिवसभर झालेल्या पावसामुळे घडली दुर्घटना. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या #🆕ताजे अपडेट्स
69 likes
79 shares