#🙏सरस्वती आवाहन🌷
संपूर्ण देशभर नवरात्रीचे पर्व अतिशय भक्ती भावाने,उत्साहाने साजरे होते.
देवीची तीन रूपे महालक्ष्मी,
महासरस्वती,महाकाली यांची आराधना म्हणजे शक्ती आराधना, संपूर्ण भारतात होते.
अनेक ठिकाणी दुर्गा सप्तशती,श्री सूक्त यांचे सामूहिक पाठ होतात.भक्तीचे हे संघटित रूप फार प्रेरणादायी आहे.!
आपणही याच साठी एकत्र आलो आहोत..
श्रीसूक्तात विश्वनिर्माती व विश्वपालक शक्ती श्रीलक्ष्मीकडे 'धन,धान्य,पशु
जल संपत्ती दे'!अशी प्रार्थना आहे.
भौतिक सुख समृद्धी बरोबरच सर्व प्राणीमात्रांचे ऐहीक व पारमार्थिक कल्याणाची कामना आहे.
यात जातवेद म्हणजे यज्ञज्वाले सारख्या पवित्र अग्नीला प्रार्थना केली आहे की,
"सुवर्णवर्णा,तृपतां,लक्ष्मीला आमच्या कडे
घेऊन ये".
अशी प्रार्थना करण्याचा अधिकार
तिच्या परिश्रमी,उद्यमशील,चारित्र्य संपन्न,ज्ञानी भक्तालाच आहे.
कारण, लक्ष्मी बरोबर येणारी अलक्ष्मी जी ,
धनसंपदा,सत्ता यांच्या आश्रयाला असते.ती अहंकार ,संपत्तीचा मद,बेपर्वाई,अन्याय,भ्रष्टाचार,शोषण यातून साकारते.
आपल्याला लक्ष्मीची आराधना करताना अलक्ष्मी दूर केली पाहिजे.
राष्ट्राच्या दृष्टीने पण लक्ष्मी महत्वाची!देशातील लक्ष्मी देशात रहावी यासाठी स्थानिक रोजगाराला चालना मिळणं आवश्यक.
यात
गृह अर्थशास्त्र सांभाळणाऱ्या स्त्री ची म्हणजेच गृहिणीची भूमिका महत्वाची आहे.आपण सजगपणे आपली खरेदी केली पाहिजे.
देश संपन्न व्हावा,आत्मनिर्भर व्हावा,यासाठी आपल्याला डोळसपणे प्रतिज्ञाबद्ध व्हावे लागेल.
"आम्ही भारताचे सामर्थ्य वाढवण्यासाठी
देशातील धन संपत्तीत वाढ होण्यासाठी,लक्ष्मी
ती देशातच स्थिर होण्यासाठी शक्यते प्रयास करु.देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू वापरण्याचा ,स्थानिक उत्पादने /वस्तू वापरण्याचा प्रयत्न करू.
वस्तू घेतांना
मेक इन इंडिया,लोकल फॉर व्होकल
हा विचार ठाम पणे मनात ठेऊनच घरात वस्तू आणू!"
श्री सूक्त पठणातून हा संदेश घेऊ.
तरच समर्थ,स्वयंपूर्ण, सुराष्ट्राची प्राप्ती होईल.
जय जगदंब!
भारत माता की जय!
स्वयंपूर्ण भारत,समर्थ भारत!!
#📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #💚 आजचा रंग मोरपंकी 🟢 #🦚आजचा रंग मोरपंखी🦚