❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
291K views • 1 months ago
#😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ते शिवनेरीवर पोहोचले असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे आंदोलनासाठी कूच केले आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला सुरूवात होण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#🔥मराठा आरक्षण आंदोलन #📢28 ऑगस्ट अपडेट्स🆕 #मोठी बातमी 🗞️😲 #भावपूर्ण श्रद्धांजली
2111 likes
75 comments • 12257 shares