*आज दाम्पत्य दिन*
*60 वयाच्या पुढील सर्व भाग्यवान "जेष्ठ नागरिक जोडप्यांना" खुप खुप हार्दीक शुभेच्छा* 🌹🙏
*आज दांपत्य दिनाच्या निमित्ताने एक सुंदर कविता, प्रत्येकाला आवडेल…*
प्रत्येकाच्या नशिबात
एक बायको असते,
आपणास कळतही नसते
*डोक्यावर ती केंव्हा बसते*
बायको इतरांशी बोलताना
गोड, मृदु स्वरात बोलते पण
अजुन ब्रह्मदेवालाही कळाले नाही
*नवऱ्याने काय चुक केलेली आहे.*
ज्ञानेश्वराने भिंत चालवली
बायको त्याच कौतुक करते,
सालं नवरा अख्खं घर चालवितो
*तेंव्हा मात्र बायको गप्प असते*
वस्तु कुठे ठेवली हे
बायको विसरते,
दिवसभर नवऱ्यावर
*उगीचच डाफरते*
लग्नात पाचवारी बायकोला
खुप होत होती मोठी,
आता नऊवारी गोल नेसतानाही
*बायकोला होतेय खुपच छोटी*
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो
तर्हाच खुप न्यारी असते,
पाहिजे तेंव्हा रेशन लागते
*नको तेंव्हा उतु जाते*
वयाच्या साठीनंतर
एक मात्र बरं असतं
बायको ओरडली तरी
*नवऱ्याला ऐकु येत नसतं*
काट्याकुट्याच्या रस्त्यातुन
नवरा किती मस्तीत चालतो
याला कारण खरं बायकोचा
*मस्त, धुंद सहवास असतो.*
बायको गावाला गेली की
देवाशपथ, करमत नसतं,
क्षणाक्षणाला रुसणारं
*घरात कुणीच नसतं*
नवरा-बायकोचं
वेगळंच नातं असतं
एकमेकांचं चुकलं तरी
*एकमेकांच्याच मिठीत जातं*
बायकोवर रागावलो तरी
तिचं नेहमी काम पडतं
थोडावेळ जवळ नसली तरी
*आपलं सर्वच काही अडत असतं*
अव्यव्यस्थित संसाराला
व्यवस्थित वळण लागते
त्यासाठी अधुनमधून
*बायकोचं ऐकावंच लागते*
💝💝💝
बायकोशी भांडताना
मन कलुषित नसावं,
दोघांचं भांडण
*खेळातलंच असावं*
नाती असतात पुष्कळ
पण कुणी कुणाचं नसतं
*खरं फक्त एकच*
*नवरा बायकोचं "नातं असतं*
*🙏सर्व दांपत्याना समर्पित🙏*!
#❤️Love You ज़िंदगी ❤️ #💕 प्यार भरी शुभकामनाएं #शुभकामना