हरयाणवी माणूस चुकीची उत्तरे देत नाही...
लोक चुकीचे प्रश्न विचारतात.
जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर वाचा...
न्यायाधीश: तुम्ही तिसऱ्यांदा कोर्टात आला आहात,
तुम्हाला लाज वाटत नाही का?
हरयाणवी: तुम्ही तर इथे दररोज येता,
तुम्हाला तर चमचाभर पाण्यात बुडून मरायला हवं! (तू तो रोज़ आवे है, तने तो डूब के मर जाना चाहिए।)
…
ग्राहक: तुमच्या म्हशीचा एक डोळा खराब आहे, तरीही तुम्ही तिच्यासाठी २५ हजार रुपये मागत आहात?
हरयाणवी: तुम्हाला म्हैस दुधासाठी हवी आहे की तिला डोळा मारायला..????? (तन्नै भैंस दूध खात्तर चाहिए या नैन-मटक्का करन खात्तर..?????)
…
न्हावी: काका, केस बारीक करायचे आहेत...?
हरयाणवी: मोठे करू शकत असाल तर मोठे करा!!
…
हरयाणवी गुरुजींना: "माझा मुलगा अभ्यासात कसा आहे?"
गुरुजी: "चौधरी, असे समजा की आर्यभट्टने याच्यासाठीच शून्याचा शोध लावला." (-"चौधरी यू समझ ले,......आर्यभट्ट ने जीरो की खोज इसके खातिर ही करी थी ।")
…
शिक्षक: तुम्हाला माहिती आहे का आमचे पूर्वज माकड होते?
हरयाणवी: तुमचे असतील, आमचे चौधरी होते? (थारे होंगे, महारे तो चौधरी थे?)
…
पत्नी हरियाणा पोलिसांना: माझा नवरा ५ दिवसांपूर्वी कोबी खरेदी करायला गेला होता, अजून परत आला नाही.
हरियाणा पोलिस: त्यात काय एवढं?
दुसरी भाजी बनवा, कोबीच बनवायला पाहिजे का?
नमोस्तुते !
पेशंट : डॉक्टर ना : डॉक्टर साहेब माझे हे ऑपेरेशन झाल्यावर किती दिवस इथे राहावे लागेल ?
डॉक्टर :ऑपेरेशन यशस्वी झाले तर एक आठवडा. नाही यशस्वी झाले तर अर्ध्या तासात सोडीन 😂🤣
विनोद अनेकदा विसंगतीमधून निर्माण होतो असे माझ्या आधीच्या पिढीतील व्यक्ती म्हणत. त्यांचे विधान खरे होते की खोटे? खरे असल्यास त्याचे एखादे उदाहरण कोणी देऊ शकेल का?
जयंत पाटील यासारखे वरिष्ठ राष्ट्रवादी पक्षाचे नेते, ज्यांच्याकडे पाहून होतकरू कार्यकर्ते तयार होत असतात, ते जयंत पाटील दांडग्या विद्यार्थ्यासारखे अध्यक्षांना निर्लज्ज असे संबोधतात तर मग बाकीच्या विरोधी नेत्याकडून सभ्य वर्तनाची अपेक्षा करता येईल का?
*नवरा आणि गाढव*
उतारवयातही बायकोची कटकट कमी होत नाही, म्हणून कंटाळून त्यानं गावात जाऊन राहायचं ठरवलं. जागा आधी घेऊन ठेवलेली होतीच. तिथे फार्म हाऊस बांधलं. छोटंसं शेत होतं, त्यात भाज्या लावल्या. एक गाय घेतली, एक गाढव घेतलं. एक कुत्रा पाळला.
या सगळ्यांच्या साथीत त्याचा दिवस मजेत जायचा. पुन्हा शहरात यायचं नावही काढायचं नाही, हे त्यानं ठरवलं होतं. मात्र त्याचं नशीब त्याची पाठ सोडायला तयार नव्हतं. बायको तिथेही त्याच्या मागोमाग आलीच. दर रविवारी ती गावात यायची आणि त्याच्या डोक्याशी कटकट करायची.
हे कुठे खबदाडात घर बांधून ठेवलंय, धड रस्तासुद्धा नाहीये गावात यायला, कशा वेंधळ्यासारख्या पसरून ठेवल्यायंत ह्या वस्तू, काय कपडे घातलेत हे? शोभतात तरी का तुम्हाला?
हे गाढव कशाला घेतलंय आणि? काय उपयोग ह्याचा?
एक ना दोन शहरात असताना तेच, आता गावात आल्यावर तेच, तो पार वैतागून गेला. इथेही सुटका नाही म्हणजे काय? पण काय करू शकणार होता बिचारा? बायकोला ह्या वयात सोडूही शकत नव्हता.
गाढवावरून तर ती दरवेळी त्याचं डोकं खायची. एके दिवशी ती आली, तेव्हा त्यानंच तिला सांगितलं, तुला गाढव नको असेल, तर तूच त्याची विल्हेवाट लाव.
बायकोला हेच हवं होतं. तिनं गाढवाला बाजारात नेऊन विकून टाकायचं ठरवलं.
गाढवाला सोडण्यासाठी तिनं दोरीला हात लावला मात्र, त्यानं मागच्या मागे दोन लाथा मारल्या, तशी बायको कडमडली व भेलकांडत कुठेतरी जाऊन पडली. पाय फ्रॅक्चर झाला, हाताला खरचटलं, पाठही चेचली गेली. डॉक्टरांनी दोन महिने तरी घरातून बाहेर पडायचं नाही, असं सांगितलं. काळजीपोटी त्यानं तिला शहरातल्या घरातच राहायला सांगितलं, दिमतीला एक मदतनीस दिली
ही दुर्दैवी घटना कळल्यावर जवळची मंडळी भेटायला आली. सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन त्रास देऊ नये, म्हणून त्यानं एकच वार ठरवून दिला होता. सगळे त्याच दिवशी आले.
तो डोक्याला हात लावून बसला होता.
काक्या, मावश्या, आत्या, शेजारणी, ओळखीच्या कुणीकुणी बायका येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत. तो होकारार्थी मान हलवून प्रतिसाद देई.
ओळखीचे काका, मामा, शेजारचे पुरुष, मित्र येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत.
तो नकारार्थी मान हलवे.
त्याच्या एका मित्राची बायको लांबून हा प्रकार बघत होती. न राहवून तिनं आपल्या नवऱ्याला विचारलं, बायका जवळ येऊन काहीतरी बोलतायंत, तुमचा मित्र होकार देतोय. पुरुष जवळ आल्यावर नकार देतोय, ही काय भानगड?
मित्र शांतपणे म्हणाला, बायका जवळ येऊन काळजी व्यक्त करतायंत. काही लागलं तर सांगा, काकूंनी आधीच गावाला जायला नको होतं वगैरे सांगताहेत. त्यांच्या गुणांचं वर्णन करताहेत, हा होकार देतोय.
आणि पुरुष?
हं...! एक दीर्घ उसासा टाकून मित्र म्हणाला, ते मित्र त्याचं गाढव दोन दिवस भाड्याने मागतायत ...
🥹🥹🫣🫣🥲🥲 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🤘टाईमपास😝 #😜भन्नाट जोक्स🤣 #👦सिंगल vs कपल मीम्स💑