आपल्याकडे असे अनेक गोड गळ्याचे गायक असतील, ज्यांच्या पत्नीला देवाने, चिरका, भसाडा आवाज दिला आहे. पण असं घडतं जगात.
नर कोकीळ पक्षी गोड गातो, पण रंगाने काळा कुट्ट असतो. मादी इतकं छान, ठिपकेदार लुगडं नेसली आहे, पण आवाज म्हणजे, नुसता कलकलाट असतो.
देवाने दान देताना, कुठे काही जास्त वाढलंय, कुठे हात आखडता घेतलाय. आपण निमूटपणे, त्याने दिलेलं भोगायचं आहे. #🌳निसर्ग फोटोग्राफी #पक्षी