🙏🌹🕉️🕉️🕉️🌹🙏 वाचाल तर रडाल 😔 जीवनाचे 20 वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधमोहीम. हे नाही ते, ते नाही हे. अशी धडपड करत करत 2–3 नोकऱ्या सोडल्या, आणि एक ठरली. थोडी स्थिरता सुरू झाली. हातात आला पहिल्या पगाराचा चेक. तो बँकेत जमा झाला आणि सुरू झाला खात्यात जमा होणाऱ्या शून्यांचा अखंड खेळ. 2–3 वर्षे पुन्हा उडून गेली. बँकेतले शून्य थोडे वाढले. वय 25 झाले. आणि मग विवाह झाला. जीवनाची रामकथा सुरू झाली. सुरुवातीचे 1–2 वर्षे मऊ, गुलाबी, स्वप्नाळू गेली. हातात हात घालून फिरणे, रंगीबेरंगी स्वप्नं. पण हे दिवस पटकन उडून गेले. आणि मग बाळ येणार ही चाहूल लागली. वर्षभरात पाळणा झुलू लागला. आता सारे लक्ष बाळावर केंद्रित झाले. उठणं, बसणं, खाणं, पिणं, लाड कोड... वेळ कधी निघून गेला, समजलंच नाही. या दरम्यान माझा हात तिच्या हातातून कधी निसटला, फिरणं-गप्पा मारणं कधी थांबलं, हे दोघांनाही कळलंच नाही. बाळ मोठं होत गेलं. ती बाळात गुंतली, मी कामात. घर आणि गाडीच्या हप्त्यांची चिंता, बाळाची जबाबदारी, शिक्षण, भविष्याची सोय, आणि त्याचबरोबर बँकेत शून्यं वाढवायची धडपड. तिनंही स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं, मीही. इतक्यात मी 35 चा झालो. घर, गाडी, बँकेत शून्यं, कुटुंब—सगळं होतं, तरी काहीतरी कमी जाणवायचं. पण काय, हे कळत नव्हतं. तिची चिडचिड वाढू लागली, मी उदासीन होऊ लागलो. दिवस निघत गेले. वेळ सरकत गेला. मुलगा मोठा झाला. त्याचं स्वतःचं जग तयार झालं. कधी दहावी आली आणि गेली, कळलंच नाही. तेव्हा आम्ही दोघं चाळिशीत पोहोचलो. बँकेतली शून्यं वाढतच गेली. एका निवांत क्षणी मला ते गेलेले दिवस आठवले. मी प्रसंग पाहून तिला म्हटलं,
विजय लोखंडे 9960154047