धनत्रयोदशीला सोन्याबाबत आली मोठी बातमी, भारत बनला सोन्याचा धनी; नेमकं कुठं, किती साठवलाय?
Gold Reserve in India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे. चीन आणि जगातील इतर देशांमध्ये मध्यवर्ती बँकांसह आरबीआयने आपला सोन्याचा साठा वाढला असून यामुळे सराफा बाजारात मात्र खळबळ उडाली आहे. केंद्रीय बँका आक्रमकपणे सोने खरेदी करत असल्यामुळे सणासुदीत मौल्यवान धातूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.