
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक
आणखी एक लक्ष्यपूर्ती!
मुंबईचा प्रवास आता काही मिनिटांत!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-3, फेज-2B, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मार्गिकेचे लोकार्पण!
#मुंबई #मुंबई मेट्रो #महाराष्ट्र
नभ: स्पृशं दीप्तम् !
भारतीय हवाई दल दिन!
भारतमातेच्या रक्षणासाठी तुमचे साहस, शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. भारतीय हवाई दलाच्या वीर योद्ध्यांना आणि परिवाराच्या समर्पणाला सलाम!
#भारतीय हवाई दल दिन
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन!
दिनांकः 8 ऑक्टोबर 2025
वेळः दु. 3ः00 वाजता
ठिकाणः उलवे, नवी मुंबई
#महाराष्ट्र #नवी मुंबई
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्श जीवनाची गाथा मांडणारे, महाकाव्य रामायणाचे रचनाकार, आदिकवी महर्षि वाल्मिकी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महर्षी वाल्मिक ऋषी जयंती #महषी वाल्मिकी जयंती #रामायण #वाल्मिकी #महर्षी वाल्मिकी
शरदाचे चांदणे, कोजागिरीची रात्र,
प्रेम, आनंद आणि समृद्धीची होईल नवी सुरूवात!
कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #कोजागिरी #महाराष्ट्र
विदर्भ क्रिकेट संघाची अभिमानास्पद कामगिरी!
मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकापाठोपाठ यंदाच्या इराणी चषकावर देखील आपले नाव कोरले आहे. नागपूर येथे पार पाडलेल्या 'इराणी चषक 2025'च्या अंतिम सामन्यात 'रेस्ट ऑफ इंडिया' संघावर 93 धावांनी विजय मिळवून विदर्भाने तिसऱ्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या ऐतिहासिक यशाबद्दल विदर्भ क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा! भविष्यात भारतीय क्रिकेट संघाला विदर्भ रणजी संघाच्या माध्यमातून उत्तमोत्तम खेळाडू लाभतील, असा विश्वास आहे.
#महाराष्ट्र
🛕 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत आज शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिराला भेट देण्याचे सौभाग्य लाभले. या शुभप्रसंगी मा. अमितभाई शाह यांनी श्री साईबाबा यांचे मनोभावे दर्शन घेत पूजा केली आणि आशिर्वाद प्राप्त केले. यावेळी आम्ही सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली!
🕦 स. ११.२५ वा. | ५-१०-२०२५📍शिर्डी, अहिल्यानगर.
#महाराष्ट्र #शिर्डी #शिर्डी साई बाबा #दर्शन #साई बाबा
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात देशाच्या सुरक्षेसाठी शौर्याने लढत वीरमरण प्राप्त करणारे पोलीस उपनिरीक्षक शहीद स्व. प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या शौर्याची आज पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांच्या कन्या अनुष्का प्रकाश मोरे यांना आज राज्य रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वावर ‘औषध निर्माता’ गट ब या पदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले.
औषध निर्माता हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने, नियुक्तीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संवेदनशील भूमिकेमुळे ‘विशेष बाब’ म्हणून अनुष्का मोरे यांची नियुक्ती शक्य झाली. शहीद वडिलांचे स्वप्न साकार करत आज अनुष्का मोरे यांनी आपल्या धैर्य, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर नव्या प्रवासाची सुरुवात केली — ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
#महाराष्ट्र #मुंबई #देवेंद्र फडणवीस
चला एकत्र येऊन आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूया!
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करावा!
आत्मनिर्भर भारत हा विकसित भारत संकल्पनेचा पाया आहे. महाराष्ट्राच्या समस्त नागरिकांनी या स्वदेशी संकल्प मोहिमेत प्रतिज्ञा घेऊन सहभागी व्हावे.
स्वदेशीचा संकल्प करा -
✅ स्वदेशीची प्रतिज्ञा घ्या.
🎥 संकल्प करताना एक छोटा व्हिडिओ रेकॉर्ड करा.
📲 हा व्हिडिओ #SwadeshiSankalp हॅशटॅगसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.
आपल्या सामूहिक प्रयत्नातून आपण हे सुनिश्चित करू की 'प्रत्येक घर स्वदेशी, घर घर स्वदेशी' हा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आत्मनिर्भरतेचा उत्सव साजरा करेल.
चला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळकटी देऊया!
#नरेंद्र मोदी #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
॥ बाळूमामाच्या नावानं चांगभलं ॥
येथे भंडारा हेचि गंध। भंडाराचि तोडे बंध। तोचि फोडे बांध। अज्ञानाचे॥
सत्कर्म व मानवतेची शिकवण देणारे कर्मयोगी श्री सद्गुरु बाळूमामा यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!
बाळूमामा जन्मोत्सव सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
#बाळूमामा #बाळूमामाच्या नावानं चांगभलं #आदमापूर #गजरबाळूमामांचा# बाळूमामांच्यानावानंचांगभलं #महाराष्ट्र