*🌼 *देवपूजा का करावी?* –
एक अध्यात्मिक संवाद
माझ्या भाच्याशी चर्चा करीत असताना त्याने विचारले,
*मामा, तुम्ही रोज देवपूजा का करता??”*
त्याचा प्रश्न ऐकून मी काही क्षण शांत झालो व त्या क्षणी मला जाणवलं....
काही प्रश्न लहान असतात, पण त्यांची उत्तरं जीवन बदलतात.
मी त्याला जवळ बसवलं आणि म्हणालो,
“बाळा, मामा,रोज देवपूजा करतो कारण पूजा म्हणजे देवाला खुश ठेवणं नाही, तर स्वतःला देवत्वात जागं करणं आहे.”
तो म्हणाला, “देव आपल्यात असतो का मामा?”
मी हसून उत्तर दिलं, “हो, देव आपल्या आत आहे, पण आपण जगाच्या गडबडीत त्याला विसरतो. रोजची पूजा म्हणजे त्या विस्मरणावरचा उपाय आहे.”
मी त्याला समजावलं “आपण जेव्हा दीप लावतो, तेव्हा तो केवळ देव्हाऱ्यातील प्रकाश नसतो, तो आपल्या मनातील अंधारावर विजय मिळवण्याचं प्रतीक असतो.
धूप देतो म्हणजे आपले विचार शुद्ध होतात.
घंटा वाजवतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते;
पुष्प अर्पण करतो म्हणजे आपल्या भावनातील प्रेम आणि कृतज्ञता देवाला अर्पण करतो.
ही सर्व क्रिया बाह्य नाही, तो अंतर्मुख प्रवास आहे.”
मी पुढे सांगितलं, “पूजा म्हणजे देवाशी संवाद नव्हे, तो आत्म्याशी संवाद आहे. जेव्हा आपण देवासमोर बसतो, तेव्हा काही क्षण आपण जगाच्या गोंधळापासून दूर जातो. त्या शांततेतून आपण स्वतःला समजायला लागतो. पूजा म्हणजे ध्यानाची पहिली पायरी.”
भाचा, मोठ्या लक्षपूर्वपणे ऐकत होता. मग त्याने विचारले,
“मामा, रोज पूजा केल्याने देव काही देतो का?”
मी म्हणालो, “देव देतो पण तो वस्तू देत नाही तो शांती, धैर्य, संयम आणि समाधान देतो. तेच खरे प्रसाद आहेत.”
मी त्याला सांगितलं की रोजची देवपूजा ही एक ऊर्जा शुद्धी प्रक्रिया आहे. पूजेच्या वेळी उच्चारले जाणारे मंत्र आणि ध्वनी कंपनं आपल्या शरीरात, मनात आणि घरात सात्त्विक स्पंदनं निर्माण करतात. त्यामुळे घरात प्रेम, शांतता आणि सहकार्य वाढतं.
ज्या घरात रोज देवपूजा होते, तिथे देव स्वतः वास्तव्य करतो.
मी म्हटलं,
“मी रोज पूजा करतो कारण मला देव बाहेर पाहायचा नाही मला माझ्यातला देव जाणवावा म्हणून करतो.”
त्याचे निरागस प्रश्न पाहून मला जाणवलं...आज मी त्याला उत्तर दिलं नाही, तर त्यानेच मला खरा अर्थ शिकवला.
देवपूजा का करावी याचं उत्तर आता मला स्पष्ट झालं.
“देवपूजा म्हणजे देवाला भेटणं नाही" तर स्वतःतील देवत्वाला जागं करणं.”
*देवपूजा ही भक्ती नव्हे, ती आत्मज्ञानाची साधना आहे.* *रोजची देवपूजा अंतर्मनाचा*
*प्रकाश जागवते.*🙏🙏🌹🌹 #माझ्या
मनातील
विचार
👍👍 #मनातील विचार