
किरण जाधव {महाराज}
@58252107
कमेंटमे जयश्री कृष्णाजी जरुर लिखो💞🌹
मैत्री,मस्ती
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*"🪷प्रामाणिकपणा🪷"*
🫠प्रामाणिकपणा हा कुठल्याही मापात, किलोत, मीटरमध्ये किंवा टक्केवारीत मोजता येत नाही. तो पैशांत विकत घेता येत नाही आणि बाहेरून दाखवता येत नाही. प्रामाणिकपणा हा रक्कतात असतो—जन्मापासून मनामध्ये भिनलेला असतो..
😌माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून, डोळ्यांतून झळकतो. प्रामाणिक माणूस स्वतःची किंमत सांगत नाही, पण त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे जग त्याला आपोआप मान, सन्मान देत असते..
🙂↕️प्रामाणिकपणा ही एखादी गोष्ट नसून ती माणसाच्या आयुष्याचे बळ आहे. तोच विश्वासाची पायरी घडवतो, नातेसंबंध टिकवतो आणि माणसाला खऱ्या अर्थाने मोठे करतो. म्हणूनच प्रामाणिकपणा शिकवला जात नाही, तो जगण्यातून उमटतो आणि जीवनाला सुगंधी बनून पसरत राहतो..
🥸काही लोक म्हणजे कचऱ्याच्या गाडी सारखे असतात. त्यांच्या मनात क्रोध, द्वेष, चिंता, निराशा असे बराच कचरा भरलेला असतो. तो कचरा हलका करण्यासाठी ते इतरांवर टाकतात. जर आपण त्यांचा कचरा उचलला तर आपणही कचरावाले होऊ..
😊म्हणून त्यांना फार महत्त्व न देता फक्त हसून दूर करत राहा.. जीवन सुंदर आहे — जे चांगले वागतात त्यांचे आभार माना, आणि जे वाईट वागतात त्यांना दूर लक्षीत करा.."
🧘🏻♂️निसर्गाचे नियम:जर शेतात बी पेरले नाही, तर गवत उगवते. त्याचप्रमाणे जर मनात चांगले विचार भरले नाहीत, तर नकारात्मक विचार घर करून बसतात..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #शुभ रात्री #शुभ रात्री
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*😌मौनाची खरी ताकद🧘🏻♂️*
🌸बुद्धिमान पुरुष कधीही धनाची हानी, मनातील वेदना, गृहिणीचे दोष, धूर्त व्यक्तीने केलेली फसवणूक आणि अपमान याबद्दल सर्वत्र बोलत नाही. कारण तो जाणतो की काही गोष्टी बोलल्याने हलक्या होत नाहीत, उलट मनावर अधिक ओझे वाढते..
🌺धन गमावल्याची गोष्ट सांगितली तर ऐकणारा हसतो किंवा दया करतो, मनातील वेदना मांडल्या तर लोक त्याला दुर्बल समजतात, घरातील दोष उघड केल्यास आपलीच प्रतिष्ठा कमी होते, धूर्त ठगाबद्दल सांगितल्यास इतरांना हसण्याचा विषय मिळतो,
आणि अपमानाची कहाणी पुन्हा पुन्हा आठवल्याने मन अधिक दुखावते..
🌹म्हणून खरा बुद्धिमान व्यक्ती स्वतःच्या जखमा स्वतःच भरून काढतो, तो शांतपणे निरीक्षण करतो, अनुभवातून शिकतो आणि पुढच्या वेळी तसाच प्रसंग टाळण्यासाठी आपली बुध्दी अधिक मजबूत करतो..
🙂↕️— दुःखात मौन पाळणे, अपमानात संयम राखणे, आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला उंचावणे, हीच खरी शहाणपणाची खूण आहे..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
चंद्राचा प्रकाश मंद
त्यात दुधाचा गोडवा
नात्यात देखील तुमच्या
रहावी दुधासारखी मधुरता
चांदण्यांत न्हालेले आकाश,
दुधाच्या गोडीत वाढला नात्यांचा विश्वास,
श्रीकृष्णाची मिळो कृपा खास,
शरद पौर्णिमेची रात जागवूया
गप्पा गोष्टी, गाण्यांची मैफिल रंगवूया
केशर दुधाचे घोट घेत, कोजागिरीचा
आनंद परिवारासोबत लुटूया..!!✍🏻
*🥛कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा..!!🙏🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम?🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #शुभ रात्री #कोजागिरी
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🍀☘️🌸विजयादशमीच्या मंगल शुभेच्छा*🍀☘️ ✨
*आजचा दिवस फक्त रावण दहनाचा नसून, तो _अंधारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा विजय_ आहे..*
*दशहरा आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही संकटे, कितीही वाईट विचार आले तरी _"सत्य आणि सद्गुण हेच अखेरीस विजय मिळवतात"..☘️_*
*🍀या शुभ पर्वावर मनातील नकारात्मकता जाळून टाका🔥, आणि धैर्य, प्रेम व सद्गुणांनी नवे जीवन सुरू करा..*
🍀🌳 *सत्याचा विजय हा निसर्गाचा नियम आहे, आणि जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जगात कुणीही पराभूत करू शकत नाही..!!✍🏻*
*☘️🍀 संस्थापक अध्यक्ष श्री किरण जाधव परिवारा कडून विजयादशमी निमित्त आपणासह परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!☘️🍀🙏🏻*
*🍀संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹🍀💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम 📿 🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #दसरा #दसरा
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
*🌳"सर्वगुणसंपन्नता"🌳*
🧘🏻♂️“सर्वगुणसंपन्न” हा शब्द ऐकता आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श व्यक्ती उभी राहते. ही व्यक्ती केवळ ज्ञानाने समृद्ध नसते, तर तिच्यात संस्कार, सद्गुण, सहानुभूती, संयम आणि सामाजिक जबाबदारी यांची परिपूर्णता असते..
🌹समाजात अशी व्यक्ती एक प्रकाशस्तंभासारखी कार्य करते, जी इतरांसाठी मार्गदर्शक ठरते. ही व्यक्ती केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन थांबत नाही, तर जीवनातील अनुभवातूनही शिकते. तिचा निर्णय नेहमी विवेकपूर्ण असतो.
💐आशा व्यक्तीत नम्रतपणा, प्रामाणिकपणा, सहानुभूती, आदर यांचा समावेश असतो. लोक त्यांना पाहून प्रेरणा घेतात.
समाजातील इतर लोकांच्या भल्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्न करते. मदत करणे त्यांच्यासाठी फक्त कर्तव्य नाही, तर जीवनाचा भाग आहे..
🌳संकटे येताच अशी व्यक्ती घाबरत नाही, तर धैर्याने त्यांचा सामना करते. त्यांचा आत्मविश्वास इतरांनाही जोडतो. सर्वगुणसंपन्न व्यक्ती नेहमी स्वतःच्या दोषांकडे लक्ष देते आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते. त्यांचा विकास कायमस्वरूपी असतो.
अशा व्यक्तीचा प्रभाव फक्त स्वतःवर नाही, तर आजूबाजूच्या समाजावरही पडतो. ते लोकांच्या मनात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. समाजात अशी व्यक्ती असणे म्हणजे एक आदर्श जीवनाची शिकवण असणे..
🥰सर्वगुणसंपन्न होणे ही एक प्रक्रिया आहे, एखादे ध्येय नाही. प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात लहान-मोठ्या पद्धतीने सद्गुणांचा विकास केला तर आपले जीवनही सर्वगुणसंपन्न होईल. शेवटी, जीवनात खरी संपत्ती ही केवळ पैशात नाही, तर गुण आणि संस्कारात आहे..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*‼️चिंतन‼️*
🌹आपल्या जीवनात गुंता आणि चिंता ही कायमची सोबत असते. प्रत्येक टप्प्यावर काही ना काही प्रश्न, आव्हाने, जबाबदाऱ्या आणि नवनवीन परिस्थिती आपल्यासमोर उभी राहतात. या गोष्टींना कधीच शेवट नसतो, कारण जीवन म्हणजे सतत चालणारा प्रवास आहे.
🌹खरे तर या प्रवासात आपल्याला सतत कुणीतरी आधार द्यावा, साथ द्यावी अशी अपेक्षा असते. परंतु खरी ताकद आपल्यातच दडलेली असते. आपण स्वतःला सांभाळायला शिकतो, निर्णय घ्यायला शिकतो, पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकतो. हीच खरी साधना आहे.
🌹या सगळ्यात आपण एकटे नसतो. आपल्या मागे सदैव एक अदृश्य शक्ती असते—ती म्हणजे "भगवान". आपण त्याला कधी देव म्हणतो, कधी नशीब, तर कधी श्रद्धा, भक्ती. पण तो नेहमीच आपल्या पाठीशी असतो..
🌹आपल्याला धीर देतो, योग्य मार्ग दाखवतो, आपल्या अंतर्मनात आशेचा किरण जागवतो..
🧘🏻♂️म्हणून आयुष्यात कितीही गुंता, चिंता किंवा संकटे आली तरी स्वतःवर विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या कृपेवर श्रद्धा ठेवा. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहिलो तर भगवंत आपल्याला पुढे जाण्यासाठी शक्ती, धैर्य आणि समाधान नक्कीच देतो.
🌹स्वतःला जपणे हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे, आणि त्या सामर्थ्याच्या सावलीतच भगवंत सदैव आपल्या सोबत असतो..✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रात्री📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #शुभ रात्री good night
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🧘🏻♂️अदृश्य शक्ती🧘🏻♂️*
जीवनात संकटे येणे हे स्वाभाविक आहे. कधी आर्थिक अडचणी, कधी आरोग्याची काळजी, कधी नात्यांमध्ये ताण.. या सगळ्यांनी मन घाबरते, हादरून जाते. अशा वेळी आपल्याला आधार देणारा हात लागतो— आश्वासक शब्दांची गरज भासते. “माझ्या नामस्मरणाने तुझ्यावर आलेल्या संकटाची झळ मी तुला लागू देणार नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” हा दिलासा म्हणजे श्रद्धेला मिळालेली उभारी आहे..
📿नामस्मरण म्हणजे केवळ मंत्र जपणे नाही, तर मनाला स्थिर करणारा विश्वास. जेव्हा आपण ईश्वराचे किंवा आपल्या गुरू मुखातून मिळालेले नाम-मंत्र घेतो, तेव्हा आपल्याला एक प्रकारचे अंतर्गत बळ मिळते. संकटांचा भार हलका झाल्यासारखा वाटतो. भीती हळूहळू कमी होते आणि मन शांत होते..
हा संदेश फक्त धार्मिक नव्हे, तर आत्मविश्वासाचा धडा देतो. कोणत्याही परिस्थितीत आपण एकटे नाही, आपल्यामागे एक अदृश्य शक्ती आहे—ही जाणीव आपल्याला धैर्य देते. श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली तर संकटे कितीही मोठी असली तरी आपण त्यांचा सामना करू शकतो..
📿नामस्मरणातून मन शांत ठेवा. संकटांना घाबरू नका; विश्वासाने पुढे चला. प्रयत्न करत राहा, कारण श्रद्धेला कृतीची साथ हवी असते. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” हा आधारच पुढच्या प्रत्येक पावलाला नवी दिशा आणि शक्ती देतो..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🌻चिंता🌻*
देवाच्या नामस्मरणाचे माणसाने नेहेमी चिंतन करावे, पण माणूस नेहमी चिंता करतो ती त्याने स्वतःच स्वतःसाठी लावून घेतलेली असते.
"चिंता" यामध्ये माणूस जास्त करून भरकटलेला व भरडलेला म्हणजे पिसलेला असते.
जेव्हा माणसावर संकटे येतात तेव्हाच त्याला बुध्दिकौशल्य व चातुर्य दाखविण्याची संधी प्राप्त झालेली असते. कितीही संकटे येऊ द्या. कधीही गांगारून किंवा घाबरून जाऊ नका. जीवनात जो उद्देश निश्चित केला असेल त्यासाठी जीवन समर्पित करा. आपल्या जीवनाला चालना कशी मिळेल ते बघा. जीवनात चिंता, संकटे हे आहे तसेच पर्याय मार्ग व आनंद हे ही सर्व असलेच पाहिजे. माणसाला चिंता आहेत म्हणूनच त्याने ईश्वर चिंतन केले पाहिजे. ईश्वरचिंतनाने माणसाचे मनोबल वाढते व आलेल्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतोच.
काहीच्या पुढे कधीकधी ध्येय अथवा संकल्प नसल्यामुळे स्वैर वागतात. हातात भरपूर पैसा आला की मन मानेल तसे. चैन करणे, मद्यपान यासारख्या व्यसनांच्या आहारी जातात. घरातल्या परंपरेनुसार वागणे विसरून जातात. यामध्ये पाऊल घसरायची शक्यता अधिक राहाते..
काळजीही मागे असली पाहिजे. जर मागे काळजी नसेल तर जीवन जगणे अवघड होईल. मनुष्य पार वेडा होऊन जाईल. मनुष्याला एखादे वेळी ४/६ दिवस एकटे राहण्याचा प्रसंग आला तर तो बेचैन होतो. त्याला काही सुचत नाही. पण त्याच्या मागे काही काळजी चिंता असली तर त्याचा विचार करण्यामध्ये त्यातून मार्ग काढण्यामागे व त्याची पूर्तता करण्यात त्याचा वेळ जाईल. हे जरी असले तरी चिंतेचे प्रमाण जास्त ठेवू नका. नाहीतर समतोल बिघडून माणूस बेचेन वेड्यासारखा वागायला लागू शकतो.
फार सुखी असेल तर माणसाला ईश्वराची आठवण होतेच असे नाही, परंतु संकटात, चिंतेत, काळजीत तरी नक्कीच देवाची आठवण होते म्हणूनच हा आपल्यावर देवाने केलेला मोठा उपकारच आहे समजावे. चिंता, दुःख, कष्ट योगायोग ने मनुष्याल रोजच्या जीवनात थोड्याफार प्रमाणात कमी अधिक जास्त आपल्या वाट्याला येतातच. चिंतेशिवाय मनुष्य जीवन नाही. चिंता असली तरी त्यातून मार्ग व पर्याय काढण्यासाठी मन स्थिर असणे गरजेचे आहे त्यासाठी चिंता सोडून ईश्वर नाम स्मरणाचे शुद्ध अंतकरणाने चिंतन केले पाहिजे, चिंता करीत बसू नये. चिंता केल्याने ती सुटत नाही. चिंतारहित होण्याचे परमार्थ हे एक उत्तम साधन आहे..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*🌒चंद्र ग्रहण निर्णय🌒*
*ग्रहण माहिती*
७ सप्टेंबर, भाद्रपद शु पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे.
*ग्रहणाचा स्पर्श:-* रात्री ९:५७
*संमीलन :-* रात्री११:००
*ग्रहण मध्य :-* रात्री ११:४२
*ग्रहण उन्मीलन :-* रात्री १२:२३
*ग्रहण मोक्ष :-* रात्री १:२७
*ग्रहणाचा पर्वकाल* :- ३ तास ३० मिनिटे राहील .
*ग्रहणाचे वेध*
ग्रहणाचे वेध रविवार ७ सप्टेंबर दुपारी १२:३७ पासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री १:२७ ग्रहणाचा वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी रविवारी दुपारी ५:१५ पासून मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री १:२७ पर्यंत वेध पाळावेत. वेधामधे भोजन करू नये, नदी- गंगा- तुळशी पत्र- स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री ९:५७ ते रात्री १:२७ पर्यंत पाणी पिणे, तसेच नशा व्यसन, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
*ग्रहणातील कृती*
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे, पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.
*ग्रहणाचे फळ*
मेष, ऋषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फल.
मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्रफल.
कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे.
ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
*मंत्र तंत्र पुरश्चरण*
नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकालात केल्याने मंत्र सिद्धी होतो.
*स्नानाविषयी*
ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहे तरीही उष्णोदकाहून शितोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे.
ग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाची वेळी नर्मदेचे स्मरण करावे.
*मोक्षस्नान आणि भोजनाविषयी*
या ग्रहणाचा मोक्ष वेळा नंतर म्हणजे रात्री १:२७ नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून नंतर भोजन करावे.
*( ग्रहण माहिती व वेळ संदर्भ - दाते पंचांगातुन घेतले आहेत )*
*ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम :-*
१) या काळात कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे.
२) पायाची अढी घालून बसू नये.
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे.
४) झोप घेऊ नये.
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण, पारायण करावे.
*ग्रहण शास्त्रार्थ*
चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण जोपर्यंत दिसत असेल तोपर्यंत पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल, तर त्यानंतर दुसर्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल; पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून, अस्तानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणचेही बिंब जर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल, तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले, तर शास्त्ररीत्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊन, स्नानदानादिक कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणिग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत.
*आंघोळीला पाणी घेण्याविषयी कमी-अधिकपणा-*
ऊन पाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक. दुसर्याने दिलेल्या पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक. त्यापेक्षा वाहाते पाणी पुण्यकारक. वाहात्या पाण्यापेक्षा सरोवराचे पाणी पुण्यकर. सरोवराच्या पाण्यापेक्षा नदीचे पुण्यकर. याप्रमाणेच तीर्थे, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकर. ग्रहणांत वस्त्रासह स्नान करावे. अशा स्नानाला काही ग्रंथकरांनी मुक्ति स्नान म्हटले आहे. ते मुक्तिस्नान जर केले नाही, तर सुतकीपणा जात नाही. ग्रहणाच्या स्नानाला मंत्राची जरूरी नसते. सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. काही बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात. सोयर अथवा सुतक यामध्ये ग्रहणाबद्दल-स्नान, दान, श्राद्ध वगैरे अवश्य करावीत. नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला, आणि बायको जर विटाळशी असली. तर भांड्यात पाणी घेऊन, त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. तीन दिवस किंवा एक दिवस उपास करून ग्रहणाची स्नानदानादि कर्मे केली असता मोठे फळ मिळते. एकच दिवस जर उपास करणे असेल, तर तो ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपास अहोरात्र करावा असेही म्हणतात. मुलगे असलेल्या व गृहस्थाश्रमी अशांनी ग्रहण, संक्रांति वगैरे दिवशी उपास करू नये. पुत्रवान् या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकार कन्यावान असा करून, तशांनीही उपास करू नये असे म्हणतात. ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांना सांगितले आहे. 'सर्व वर्णांना राहुदर्शनाचे सूतक आहे' म्हणून ग्रहणकालात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्याने धुऊन शुद्ध करावीत. गाई, भूमि, सोने, द्रव्य, धान्य वगैरेचे जर ग्रहणांत दान केले, तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो, तो दानपात्र होय. सत्पात्री दानाचे मोठे पुण्य आहे. 'चंद्र-सूर्याच्या ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे, सर्व दाने भूमिदानासारखी असे वचन आहे. ग्रहणांतले श्राद्ध करायचे ते आमान्नाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्ने करून करावे. सूर्यग्रहणांत तीर्थयात्रांग श्राद्धाप्रमाणे ज्यात तूप मुख्य आहे अशा अन्नाने श्राद्ध करावे. ग्रहणात श्राद्धाला जेवणारा महादोषी होतो. चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणात तीर्थाचे ठिकाणी महापर्वकाळी मंत्राची जर दीक्षा घेणे असेल, तर महिना, नक्षत्र वगैरे शोधण्याची जरूरी नाही. मंत्रदीक्षा घेण्याचा प्रकार तंत्रग्रंथात पाहावा. दीक्षा शब्दात उपदेशाचा अन्तर्भाव होतो. युगायुगात दीक्षा होते आणि कलियुगात उपदेश होतो. मंत्र घेण्याच्या कामी सूर्यग्रहणच मुख्य आहे. चंद्रग्रहणात जर मंत्र घेतला, तर दारिद्र्यादिक दोष प्राप्त होतात असे काही सांगतात. 'आधी उपास करून, चंद्रसूर्याच्या ग्रहणांत स्नान करावे; आणि स्पर्शकालापासून मोक्षकाला पर्यंत एकाग्रचित्ताने मंत्राचा जप करावा, मग जपाचा दशांश होम करावा, आणि नंतर होमाचा दशांश तर्पण करावे. होम करण्याचे सामर्थ्य नसल्यास, होमसंख्येच्या चौपट जप करावा.' मूलमंत्राचा जप करून, त्याच्या शेवटी द्वितीया विभक्त्यंत असा मंत्रदेवतेच्या नावाचा उच्चार करून,
*'अमुकदेवता तर्पयामि नमः'*
असे मोठ्याने म्हणावे. यवादियुक्त अशा पाण्याच्या ओंजळींनी होमाच्या दशांशाने तर्पण करावे. याप्रमाणे 'नमः' पर्यंत संपूर्ण मूलमंत्राचा उच्चार करून, अमुक देवतेला मी अभिषेक करतो असे म्हणून तर्पणाच्या पाण्याने आपल्या स्वतःच्या मस्तकावर अभिषेक करावा. याप्रमाणे तर्पणाच्या दशांशाने मार्जन करावे व तर्पणाच्या दशांशाने ब्राह्मणभोजन घालावे. याप्रमाणे- जप, होम, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मणभोजन हे पाच प्रकारांच्या रूपाचे पुरश्चरण होय. तर्पण वगैरे करणे जर अशक्य असेल, तर त्या त्या संख्यांच्या चौपट जप करावा. हा जो पुरश्चरणाचा प्रकार सांगितला, तो ग्राससहित उदय अथवा अस्त पावणार्या ग्रहणांत होत नाही. पुरश्चरणसंबंधाने जो उपास करावयाचा, तो पुत्रवान आणि गृहस्थाश्रमी यांनीही करावा. पुरश्चरण करणार्याच्या नित्य नैमित्तिक स्नानदानादिकांचा जर लोप होईल, तर दोष सांगितला असल्याने, स्नानदानादिक कर्मे मुलगा, बायको वगैरे प्रतिनिधींकडून करवावी..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवारी आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*जीवन में सभी चीजें एक साथ हासिल नहीं होतीं दौलत है तो रिश्ते कम हैं,रिश्ते हैं तो दौलत कम है,दोनों हैं तो सेहत कम हैं, और अगर तीनों हैं तो जीवन कम हैं..!!✍🏻*
*संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संथ्या🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपका दिन मंगलमय हो📿 🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning