Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 दत्तात्रेयांचे सोळा अवतार - पहिला अवतार - योगिराज🌹🌹 दत्तात्रेयांचे सोळा अवतार वेगवेगळया मुहूर्तावर झालेले असून त्यांची स्वरुपेही वेगवेगळी आहेत. श्री दत्ता अत्रिमुनि व महासती अनुसया यांच्या उदरी त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रुपाने आर्विर्भूत झाले. अत्रिमुनीच्या घरी जन्माला आले म्हणून त्यांना आत्रेय हे नांव मिळाले. दत्त व आत्रेय ही दोन्ही नावे एकत्र करुन लोक त्यांना दत्तात्रेय या एकाच नावाने ओळखू लागले. सर्व योग्यांचे ते राजे असल्यामुळे त्यांना “ *योगिराज*”असे नाव देण्यात आले. अत्रिमुनींच्या सान्निध्यात राहून त्यांनी जो पहिला अवतार घेतला, तो कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रावर घेतला. त्या दिवशी बुधवार होता. हा अवतार प्रहारातील पहिल्याच मुहूर्तावर झाला. स्वतः निराकार असूनही भगवान दत्तात्रेय हे साकार बनले. हा अवतार एकमुखी व चतुर्भुज प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच आहे.
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
लोभ हा परमार्थाची अतिशय हानी करतो आणि आजकाल आपण पाहताच आहात की जणू पैसा हेच जीवन झाले आहे. महाराज व एकनाथ महाराजांसारख्या संतांनी लोभापासून साधकाने दूर राहावे हे वेळोवेळी सांगितले आहे. प्रपंचात राहणा-या माणसाला संग्रह आवश्यक आहे यात शंका नाही; पण तो किती असावा याला काही मर्यादा आहे. आपण स्वतः, आपल्या कुटुंबातील माणसे आणि आला-गेला यांच्या अन्नवस्त्र, औषधपाणी, अडीअडचणी भागतील इतका पैसा व इतर वस्तू संग्रहात असणे गैर नाही. परंतु, संग्रह करण्याचा नाद एकदा का लागला आणि पैसा हातात असला म्हणजे सामान्य माणूस भलतीकडे वाहात जातो आणि नुसता संग्रह करत सुटतो. अमक्या वस्तूशिवाय आपले चालतच नाही अशी खोटी कल्पना करून आपल्या जीवनाला तो कृत्रिमता आणतो. कृत्रिम जीवन जगणा-या माणसाला परावलंबित्व येते. असा माणूस कधीही भगवंताच्या आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही. जर अंतिम आनंद ज्याला खरी Truth Value आहे तो मिळणार नसेल तर खरोखर सर्व काही व्यर्थ आहे. हे समजून साधन करणाराच अंतिम ध्येयाप्रत पोहोचतो. 🌿🌿 *प. पू. बाबा बेलसरे (भावार्थ भागवत)* 🌿🌿 #🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - ShareChat
श्री दत्तात्रयांचे स्वरुप - एकमुखी की त्रिमुखी आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे. उपनिषदे, पुराणे व महाभारत पाहिले, तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत. इतकेच नव्हे, तर प्राचीन मूर्तिविज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत. भागवतात देवत्रयींनी अत्रिंना “यद् न ध्यायति ते वयम्” “तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत.” पुढे तेराव्या शतकापासून ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती’ असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीच झाले आहे. ‘गुरुचरित्रा’तील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीहून दत्तभक्तीची प्रेरणा मिळविणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते होते. थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी व षड्भुज दत्तात्रेय आहेत. या मूर्तीच्या सहा हातांत शंख, चक्र, त्रिशूल, डमरू, कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहेत. या मस्तकावर जटाभार, मुकुट व कमरेला पितांबर आहे. ही मूर्ती तांब्याची असून तिचेच चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारले आहे. निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरू रघुनाथस्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षड्भुज दत्तात्रेयांचा. याच निरंजन रघुनाथांचे शिष्य झाशीचे नारायण महाराजांना गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. तोही एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे. सांप्रताचे ध्यान हे नाथसंप्रदायाच्या प्रभावामुळे जनमानसात रुजलेले आहे. भगवान दत्तात्रेय हे अनादि शक्तीचे रहस्य जाणणारे व आद्य आहेत. नाथसंप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविद्येचे प्रवर्तक मानले आहे. आज मितीला नवनाथांमुळे नाथसंप्रदाय ओळखला जात असला तरी आणि नाथसंप्रदायातील अनेकांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जाऊन भिडत असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा आहेत. या त्रिमूर्तीचे आणि दत्तात्रेयाचे एकीकरण कसे आणि केव्हा घडून आले ? असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा रहाणे स्वाभाविक आहे. इ. स. १२०० पर्यंत दत्तात्रेयाचे स्वरूप एकमुखीच होते; परंतु पुढे पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधराने लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’त मात्र दत्तात्रेयाचे स्वरूप त्रिमूर्ती बनले. हा बदल घडून यायला दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता. त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तीनही देवतांचा आशीर्वाद दत्तजन्माला कारणीभूत आहे. #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की यात काय आहे? दुकानदार म्हणाला त्यात मीठ आहे. संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात साखर आहे. असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले आणि यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात श्रीकृष्ण आहे. संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला "महाराज तो रिकामा डबा आहे, पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो." बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते ईश्वराला म्हणाले "अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो घरदार सोडून संन्यासी झालो ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकविलीस. परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे". असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला. *जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख* अशा लौकिक गोष्टीने भरले आहे तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली *तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही*
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🌹देवी देवता🙏 मठात कायम समाराधना होत असत . नैको S पि दिवसो यातो विना ब्राह्मणभोजनम् ll समाराधना नाही असा एकही दिवस नसे . एके दिवशी काश्यप गोत्री भास्कर नावाचा ब्राह्मण तिथे आला . सोबत तीन माणसांना पुरेल इतका शिधा होता . स्वल्प होते तंडुल कणिक ll थोडे तांदूळ ,कणिक असा शिधा घेऊन तो गाणगापूरच्या मठात आला. कशात आणणार ? एक छोटेसे गाठोडे बांधून घेऊन आला . मनात आपणही समाराधना करावी हा विचार होता .गुरुमहाराजांचे दर्शन घेतले ,साष्टांग नमस्कार करून महाराजांना प्रार्थना केली . आला त्या दिवशी अन्य एका ब्राह्मणाची समाराधना होती .त्याला भोजनाकरिता बोलावून घेऊन गेले , रात्र झाली . हा ते गाठोडे उशाला घेऊन निजला . दुसऱ्या दिवशी अन्य एकाची समाराधना होती . तिसऱ्या दिवशी अन्य कोणाची . असे करता करता तीन महिने झाले . मठातील भक्त मंडळी याचा उपहास करू लागली . चक्रुस्तस्योपहासं तं शुश्राव श्रीगुरूः स्वयम् ll गुरूमहाराजांनी हा उपहास ऐकला . भास्कर ब्राह्मणाला महाराज बोलावून म्हणाले ,आज तुझी समाराधना असावी . महाराजांचे हे वाक्य कानी पडताच भास्कराला अत्यानंद झाला . महाराजांच्या पायावर डोके ठेऊन धावतच स्वयंपाकाची अन्य सामग्री आणण्यास गेला . हर्षे गेला आइतीसी ll दोन शेर तूप आणले .शाका म्हणजे भाज्या आणल्या . स्नान करून स्वयंपाकास लागला . समस्त ब्रह्मवृंद महाराजांना म्हणाला ,आज समाराधना राहिली ,नित्य मिष्टान्न होत असे ,आज मात्र घरी जेवावे लागणार असे दिसते . गुरुमहाराज म्हणाले ,का घरी जाताय ? स्नान करून या ,इथेच भोजन होऊ द्या . हे ऐकून समस्त ब्राह्मण मनात विचार करते झाले ,मठात सामग्री आहे कदाचित गुरुमहाराज त्याचा स्वयंपाक करवतील . सर्व स्नानाला गेले . महाराज भास्कर ब्राह्मणाला म्हणाले ,स्वयंपाक झाला असेल तर सर्वाना बोलावून ये . भास्कर सर्वाना बोलावण्यासाठी गेला असता ते म्हणाले अरे रात्र होईल ,गुरुमहाराजांची भिक्षा होऊ दे . मात्र गुरुमहाराजांचा सहभोजनाचा निश्चय ऐकून तो पुनश्च बोलावण्याकरिता गेला . मात्र ते येईनात तेव्हा गुरुमहाराजांनी मठातील अन्य काही शिष्याना त्यांना बोलावण्यास पाठविले . सर्व ब्राह्मण स्नान करून आले तेव्हा गुरुमहाराज सर्वाना म्हणाले पत्रावळी करा आणि भास्कराला म्हणाले या समस्त ब्राह्मणांना तू आज सहकुटुंब जेवावे म्हणून निमंत्रित कर . या निमंत्रणावर ब्राहमण म्हणाले ,रे भास्करा आम्हा इतक्यांना जेवायला बोलावतोस ,एकेक शीत तरी वाट्याला येईल का ?? यावर काही वृद्ध ब्राह्मण मंडळींनी दटावून सर्वाना म्हटले ,गुरुमहाराज जसे आज्ञापित आहेत तसे तो सांगत आहे तेव्हा उपहास करू नये . पत्रावळी झाल्या तोवर भास्कर ब्राह्मणाने महाराजांची पूजा केली . महाराज म्हणाले , स्वयंपाक आमच्यापाशी आणून ठेवा . स्वतःची छाटी महाराजांनी त्यावर घातली आणि आपल्या कमंडलूतील जलाचे प्रोक्षण केले . महाराज म्हणाले अन्न न उघडता ,काढून घ्या आणि पंगतीत वाढा . हे ऐकताच अनेक ब्राह्मण वाढायला उठले . सह्पंक्तीसी श्रीगुरुसी l जेवितांती अतिहर्षी ll भास्कराने आपल्या हाती तूप घेतले आणि आग्रहाने वाढत होता . विप्र म्हणती पुरे करी l आकंठ मर्यादा जेवलो ll सर्व संतुष्ट झाले . नंतर त्यांचे कुटुंबीय ,गावातील अन्य प्रजा ,प्राणिमात्र सर्व जेवले . तेव्हा गुरुमहाराजानी भास्कर ब्राह्मणाला जेवून घ्यावयास सांगितले . शेवटी पाहिले असता जेव्हडा स्वयंपाक केला होता तेव्हडाच शिल्लक होता . ते सर्व अन्न जलचरांना घातले . भास्कर ब्राह्मणाला गुरुमहाराजांनी आशीर्वाद दिला ,वर देती दारिद्र दुरी l पुत्र पौत्र होतील तुज ll दत्त महाराजांच्या लीला अगम्य आहेत ,महाराजांच्या ह्या प्रसंगाच्या वेळी आम्ही कोणत्या जन्मात ,योनीत असू ठाऊक नाही मात्र आज ह्या कथा वाचायचे ऐकायचे भाग्य आम्हाला लाभते आहे हे हि नसे थोडके ,भाग्यवान आहोत !! श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
🌹देवी देवता🙏 - ShareChat
❗३ डिसेंबर❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌹प्रवचनाचा विषय🌹 🟥🟫🟥नाम हे रामबाणासारखे आहे.🟥🟫🟥 💠बाळांनो❗ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा हा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही.💠 💢ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृष्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल❓पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला, तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडला नाही.💢 ♦यापुढे कुणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्या शिवाय राहू नये.जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील. हे माझे सांगणे खरे माना.♦ 🛟प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टाहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा.🛟 🔸️नाम रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण; आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुनः परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे एक साधन आहे.🔸️ 🔹️खरोखर, नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे, तो पर्यंत नाम घेता येते.🔹️ ❄पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.❄ 🌀ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे.🌀 🏵ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते.नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सर्व ऐश्वर्ये तुच्छ वाटतील. 🏵 ⭕हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा, आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या, हाच माझा सर्वांना आशिर्वाद.⭕ 🚩#बोधवचन:नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे, रंगला की नाम सुटणारच नाही.🚩 🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹 🌲श्री राम जय राम जय जय राम🌲 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
*श्री #विष्णु #सहत्रनाम #स्तोत्राचा #महिमा.* विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र मध्ये आपल्या जीवनात उपयोगी येणारे काही मंत्र दडलेले आहेत ते आज आपणा समोर सादर केले आहेत.सदरचे मंत्र आपल्या रोजच्या जीवनात किती उपयोगी आहेत त्याचा उपयोग आपण करावा. *01) पोटाचे विकार दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः|| ||अनघो विजयो जेता विश्वयोनि: पुनर्वसु: ||१६ *02) मानसिक विकार दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||वैद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु:|| अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल:||१८ https://www.youtube.com/@Shriketankulkarni #🌹देवी देवता🙏 *03) स्मरणशक्ती वाढण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||महाबुद्धिर्महावीर्यो महा शक्तीर्महाद्युति:|| अनिर्देश्यवपु: श्रीमान् अमेयात्मा महाद्रिधृक ||१९ *04) इच्छापुर्ण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||अससङ्ख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि:|| सिद्धार्थ:सिद्धसङ्कल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: ||२७ *05) रोग देशाकरिता खालील मंत्र म्हणावा.* ||अमृतांशूद्भवो भानु:शशबिन्दु: सुरेश्वर:|| औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: ||३१ *06) कार्यात यश मिळण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनऽनल:|| ||कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु:||३२ *07) विजय मिळविण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः|| || अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित ||३३ *08) नोकरीत व व्यवसायात वाढ होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः|| परर्द्धि:परमस्पष्टस्तुष्ट:पुष्ट: शुभेक्षण:||४२ *09) साधनेतील बाधा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||वैकुण्ठ: पुरुष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु:|| हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षज:||४४ *10) संकटात रक्षण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||ऋतु:सुदर्शन: काल: परमेष्ठी परिग्रह:|| उग्र: संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण:||४५ *11) अर्थ प्राप्तीसाठी आपण खालील मंत्र म्हणावा.* ||विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाण बीजमव्ययम् || ||अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महधनः||-४६! *12) कल्याण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||अनिवर्ती निवृत्तामा सङ.क्षेप्ता क्षेमकृच्छिवः|| ||श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमंतांवरः||-६४ *13) देवाची कृपा होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः|| ||श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाॅंल्लोकत्रयाश्रयः||६५ *14) विवाह योग* *येण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः|| ||अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनंतो धनञ्जयः||७० *15) ज्ञान होण्यासाठी* *खालील मंत्र म्हणावा.* ||ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः|| ||ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः||७१ *16) मोक्षाकरिता* *खालील मंत्र म्हणावा.* ||सद्गगतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः|| ||शुरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः||७५ *17) वासनांचा नाश करण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽ नलः|| ||दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोथाऽपराजितः||७६ *18) शत्रूची पीडा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः|| ||न्यग्रोधोदुम्बरोऽ श्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः||८८ *19) चिंता दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः|| ||अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः||८९ *20) वाईटस्वप्नाचा नाश होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा.* ||उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः|| ||वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः||९९
🌹देवी देवता🙏 - हलक् Tನನಾ |$8| Shriketan Kulkami हलक् Tನನಾ |$8| Shriketan Kulkami - ShareChat
💐🌹संयम धरा .....🌹💐 एका राजाच्या दरबारात एका नृत्यांगनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नर्तकीच्या नृत्य कौशल्याची ख्याती सर्वदूर पोहचली होती. राजाने त्याच्या गुरुंना पण आग्रहाचे निमंत्रण दिले होते. गुरु आले,आसनस्थ झाले आणि कार्यक्रम सुरु झाला. नर्तकी रात्रभर अथक नाचत होती, बघणारे पण रात्रभर जागेच होते. हळूहळू पहाट झाली आणि नर्तकीच्या लक्षात आलं की आपल्या तबलजीच्या डोळ्यांवर झोपेची झापड आली आहे. दुसर्‍या क्षणाला नर्तकीने एक दोहा म्हणायला सुरुवात केली ॥ घणी गई थोड़ी रही, या में पल-पल जाय एक पलक के कारणे,यूं ना कलंक लगाय ॥ याचा भावार्थ असा की 'रात्र जवळ जवळ संपलीच आहे .आता घटकाभरात दिवस उजाडणार आहे.तू रात्रभर जागा राहून जे मिळवलेस ते आता काही क्षणांसाठी वाया घालवू नकोस' हा दोहा ऐकल्यावर तबलजीच्या डोळ्यात तरंगणारी झोप उडाली आणि पुन्हा कार्यक्रम जोरात सुरु झाला. थोड्याच वेळात जसा कार्यक्रम संपला आणि नर्तकी खाली बसली तसे राजाचे गुरु पुढे आले आणि त्यांनी नर्तकीला पदस्पर्श करून नमस्कार केला. ते बाजूला होत आहेत तोपर्यंत राजकुमार पुढे आला आणि त्याने आपला मुगुट नर्तकीच्या पायाशी ठेवला. तो बाजूला होताच राजकुमारी पुढे आली आणि तिने गळयातला हात नर्तकीच्या गळ्यात घातला. सिंहासनावर बसलेला राजा अचंबित होऊन हे बघतच होता. त्याने गुरुंना विचारले तुम्ही हे काय केलेत गुरुजी ? गुरुजी म्हणाले 'मी इतके वर्षं तप करत होतो पण आज तुम्ही नृत्य बघायला बोलावल्यावर मी सगळं काही विसरून रात्रभर तेच बघत बसलो. काय उपयोग माझ्या तपाचा जर मला माझा मोह आवरता येत नसेल तर ? असे म्हणून ते निघून गेले. राजपुत्र पुढे आला आणि म्हणाला ' मी बरीच वर्षे तुम्ही मला सिंहासनावर कधी बसवणार हा विचार करत होतो पण तुम्ही सिंहासन सोडतच नाही असे वाटल्यावए मी उद्या बंड करून- तुम्हाला संपवून राजा बनायच्या तयारीत होतो.' पण आज हा दोहा ऐकला आणि ..... राजकन्या म्हणाली ' तुम्ही तुमच्या कारभारात इतके व्यग्र असता की माझे लग्नाचे वय निघून जाते आहे असे वाटून मी लवकरच तुमच्या माहूताच्या सोबत पळून जाणार होते. पण आज हा दोहा ऐकला आणि मी कोणत्या दरीत उडी मारणार होते ते मला उमगले' दरबारात अचानक शांतता पसरली. हे सगळं ऐकून राजा म्हणाला की माझ्या सत्तेच्या नादात जे विसरलो होतो ते आता मला या दोह्यातून समजले. राजाने मुलाचा हात धरून त्याच्या डोक्यावर स्वतःचा मुगुट ठेवला आणि त्याला राजा बनवले. राजकन्येला म्हणाला 'आता तुझ्यासाठी योग्य वर शोधणे हे एकच काम मला करणे बाकी आहे. **** आपल्यासाठी या दोह्याचा अर्थ असा की ' संयम धरा.आयुष्यभर केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळणारच आहे.आततायीपणा करून त्या प्रयोजनाला संपवू नका ! तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की सांगा ! #shreedattarajgurumauli #dattagurumaharaj #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - SHREEIUIUDLTT SHREEIUIUDLTT - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 चिंतेत बघून म्हणालो ,काय बुवा , आज अस्वस्थ दिसताय ! म्हणाले ,अहो आचार्य ,किती ठरवतोय पण गुरुचरित्राचे पारायण काही होत नाही ,नित्य वाचनात देखील अनंत विघ्ने येतात . मी हसत म्हणालो ,अहो ते तर नित्याचे आहे . कलियुगात उपासना शीघ्र फलदायी असल्याने काहीही करायला जा ,सहजसाध्य नाही . केवळ पोथी उघडताच याच्या प्रत्ययाची सुरुवात होते . जांभया येतात ,मन भरकटते ,कोणीतरी हाक मारते ,फोन येतो ,अचानक पाहुणे येतात ---नाना तऱ्हा . पण म्हणून आपण ध्यास का सोडावा ? अहो थोरल्या महाराजांनी गुरुचरित्राची चार चार प्रतिरूपे तयार केली आहेत . समश्लोकी ,द्विसाहस्री ,सप्तशती आणि त्रिशति गुरुचरित्र काव्य . संस्कृत नसेल जमत तर यामधील प्राकृत असे सप्तशती गुरुचरित्रसार वाचा ,केवळ सातशे ओव्या आहेत ,आणि ते देखील जमत नसेल तर इतर अनेक रूपात गुरुचरित्र सार आले आहे . यात अनेक अष्टके आहेत ,धावे आहेत ,पदे आहेत . करुणा त्रिपदीच्या दुसऱ्या पदात देखील चार अध्याय आले आहेत . गो नि दांडेकर यांच्यासह अनेक दिग्गज लेखकांनी गुरुचरित्राची गद्य रूपे तयार केली आहेत ,ती देखील वाचू शकता . एक गुरुचरित्र दिनदर्शिका देखील पाहण्यात आहे ,रोज एक पान गुरुचरित्राच्या लीलांवर लिहिलेले असे . गुरुचरित्राची लघु अशी रूपे देखील आहेत यात एकावन्न श्लोकी ,बावन्न श्लोकी आदी प्रकार आहेत . केवळ अध्यायातील चित्रे पहिली तरी गुरुचरित्राची उजळणी होते ,गुरुमहाराजांच्या सर्व लीलांचे स्मरण होते . बुवा , शेवटी हे स्मरण महत्वाचे आहे ,त्याचे चिंतन महत्वाचे आहे . केवळ हे केलेत तरच दत्त महाराज कृपा करतील अन्यथा नाही असे नाही .बुवा ऑटोमोबाइल इंजिनिअर तेव्हा त्यांना कळेल अशा भाषेत म्हणालो ,पुण्याईचे चढाव चढताना भक्तीच्या इंधनाचा खप खूप होतो ,चढावंच तसे कष्टाचे असतात . फक्त उपरतीचा गिअर मात्र पडावा लागतो , पण पापाच्या उतारांवर जाताना काही कष्ट पडत नाहीत ,आपोआप घसरत जाता .कोणत्याही गिअरची गरज नाही . न्यूट्रल पुरेसे आहे . बुवांचे हसणे म्हणजेच माझी मात्रा लागू पडल्याचे द्योतक होते . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सेवेत येणे खूप सोपे आहे. सेवेतून निघून जाणे त्याहून सोपे आहे. पण महाराजांच्या सेवेत टिकून राहणे खरे शंकर भक्त होण्याची खूण आहे. महाराज खूप अनुभव देतात. कधी कधी आपल्या मनासारखे होत नाही म्हणून आपण महाराजांवरची श्रध्दा कधी कमी होऊ देऊ नये. आपल्या साठी चांगले असेल तेच ते आपल्याला देतात. आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो. पण महाराज आपल्या पुर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात. महाराज आपण केलेली सेवा व्याजासह परत करतात. म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते. तीच महाराजांची कृपा होय महाराज जगाचे चालक, मालक, पालक आहे. त्यांच्या ईच्छे शिवाय झाडाचे पान देखील हालत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना... Whatsapp वरून साभार
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat