#😮प्रसिद्ध अभिनेत्रीवर शारिक छळ झाला🔴 माझ्या लग्नाचा निर्णय चुकला हे मला सहा महिन्यातच कळलं..
झी मराठी वरील अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी वाघने तिच्या लग्नाबद्दल आणि ६ महिन्यात घेतलेल्या घटस्फोटबद्दल बोलली. 'अस्मिता' ही मालिका सुरू असताना सेटवर मयुरी आणि पियुष रानडेची मैत्री झाली. त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण काही वर्षांतच मयुरी आणि पियूष या जोडप्याचा घटस्फोट घेतला. मयुरीने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. तिने नुकतीच 'मित्र म्हणे' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. मयुरी म्हणाली की, 'आता मला कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये. पण, मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं. कारण आताची पिढी मी पाहते, लोक खूप विचार करून लग्न करतात. मी हे केलं नाही… आताच्या मुली खरंच खूप फार सॉर्टेड आहेत. त्यांना **** इतका पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं स्वतःच घर असायला पाहिजे. मी असा कधी विचार केलाच नाही. आमचा प्रवास सुरू होता आणि त्यातच मी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. घरच्यांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी हे सगळं पटलं न्हवता तरीही त्यांनी मला पाठिंबा दिला. पण मला सहा महिन्यांतच जाणवलं आपण घेतलेला निर्णय चुकला. मला कळायला आणि स्वीकारायला बराच वेळ लागला.' असं मयुरीने सांगितलं. सोनी मराठीवर ‘ती फुलराणी’ शूट करत होते. तेव्हा मी डिस्टर्ब होते आणि सीन संपला की हिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे माझ्या सहकलाकारांना दिसत होतं. मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूप वेळ लागला. आता जाणवतं की ह्या सगळ्याचा विचार आधी का नाही मी केला? ह्या सगळ्यातून बाहेर यायला मला सहा महिने लागले. तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले.