ShareChat
click to see wallet page
पुरुषाला फार काही नको असतं ओ... फक्त थोडं प्रेम, थोडा आदर आणि थोडी जवळीक. जेव्हा घरात शांतता, संवाद आणि प्रेम असतं, तेव्हा तो जग जिंकायला तयार होतो. प्रत्येक पुरुषाला आपल्या जोडीदाराकडून, आपल्या बायकोकडून फक्त तीन गोष्टींची गरज असते.. पहिली म्हणजे शांत आणि प्रसन्न वातावरण. दिवसभर जगाशी लढून तो घरी परततो तेव्हा आल्या आल्या त्याला किरकिर नको असते. आपलं घर हे त्याच्यासाठी युद्धभूमी नसावं तर आपलं घर म्हणजे त्याचं ऊर्जास्थान असावं असं त्याला वाटतं. वाट पाहणारी एक शांत मिठी.. समजून घेणारा संवाद आणि एक विश्वासाचं नातं. यातून त्याचं मानसिक संतुलन राहतं आणि दुसऱ्या दिवशी त्याच ताकतीनं तो जगाशी पुन्हा लढायला तयार असतो . दुसरी गोष्ट म्हणजे आदर. मला आदर सन्मान मिळावा हे पुरुषांच्या DNA मधेच कुठंतरी असतं. त्याला वाटतं की त्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवा .. त्याच्या नेतृत्वावर श्रद्धा असावी. बस मग तो तुमच्यासाठी जग जिंकायला सुद्धा तयार असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जवळीक. हो म्हणजे शरीरिकच जवळीक नाही तर मानसिक, भावनिक , प्रेमाची जवळीक. "तु मला आवडतोस, तु खूप काही करू शकतोस माझ्यासाठी, तु खूप काही करतोय माझ्यासाठी, तुझ्यात प्रचंड टॅलेंट आहे .. तु ठरवलं तर काहीही करू शकतोस. " हे छोटे छोटे शब्दही त्याचे मन जिंकतात. एकदा या तिन्ही गोष्टी मिळाल्या की तो तुमच्यावर फक्त प्रेमच करणार नाही तर जीव देखील ओवाळून टाकेल.. एका छोट्या प्रयत्नाने मोठं प्रेम फुलू शकतं! ❤️ तुमच्या नात्यात अशी ताकद आहे का ? 💯✅👆 #स्त्री आणि पुरुष #स्त्री पुरुष समानता #स्त्री-पुरुष #पुरुष स्त्री #स्त्री पुरुष
स्त्री आणि पुरुष - ShareChat

More like this